Imran Khan : दिवाळखोर पाकिस्तानला आता 'या' देशाची मदत मिळणार? इतर देशांकडून कर्ज घेण्यासाठी प्रयत्न
गेल्या 23 वर्षात पाकिस्तानी पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे
Imran Khan : युक्रेनच्या (Ukraine) संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) दोन दिवसांच्या रशिया (Russia) दौऱ्यावर जात आहेत. गेल्या 23 वर्षात पाकिस्तानी पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेणार आहेत. 1999 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा पंतप्रधान रशियाला (russia) जात आहे. यापूर्वी 1999 मध्ये मार्च महिन्यात तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawab Malik) रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. पाकिस्तानची (pakistan) आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे इम्रान खान (PM Imran khan) सरकार इतर देशांकडून कर्ज घेऊन आपली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर PM इम्रान खान यांचा रशिया दौरा
बैठकीदरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ऊर्जा सहकार्यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इम्रान खान आणि व्लादिमीर पुतीन अफगाणिस्तानातील परिस्थितीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करतील. शीतयुद्धात इस्लामाबादने अमेरिकेची बाजू घेतल्याने पाकिस्तान आणि रशियामधील संबंध फारसे मजबूत मानले जात नाहीत आणि 2001 मध्ये अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर वॉशिंग्टनने त्याला प्रमुख गैर-नाटो सहयोगी म्हणून दर्जा दिला होता.
पाकिस्तानचे अमेरिकेसोबतचे संबंध बिघडू शकतात
आधीच विदेशी कर्जाच्या दलदलीत बुडालेला पाकिस्तान रशियाकडेही कर्जाची मागणी करू शकतो, असे मानले जाते. भू-राजकीय विश्लेषक आणि बलुचिस्तानचे राजकारणी जान अचकझाई यांनी सांगितले की, या भेटीचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे रशियाला निमंत्रित न होता आमंत्रित करण्यात आले होते. अचकझाई म्हणाले की, रशियाने पाकिस्तानचा पाठिंबा घेतला नाही, तसेच अमेरिकेने पाकिस्तानला मॉस्कोला जाण्यापासून रोखले नाही. मात्र, रशिया आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारच्या करारानंतर पाकिस्तानचे अमेरिकेसोबतचे संबंध बिघडू शकतात, असे मानले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन तणाव: UNSC मध्ये तातडीने चर्चा, भारताने म्हटले...
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha