एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या विमानाने प्रवाशांना भररस्त्यात उतरवलं!
आत्तापर्यंत आपण बस, किंवा खासगी गाडीचं टायर पंक्चर झाल्यानं प्रवाशांना भररस्त्यात उतरावं लागल्याचं पाहिलं असेल. पण पाकिस्तानच्या विमानाने प्रवाशांना भर रस्त्यात उतरवल्याची घटना शनिवारी घडली.
लाहोर : आत्तापर्यंत आपण बस, किंवा खासगी गाडीचं टायर पंक्चर झाल्यानं प्रवाशांना भररस्त्यात उतरावं लागल्याचं पाहिलं असेल. पण पाकिस्तानच्या विमानाने प्रवाशांना भर रस्त्यात उतरवल्याची घटना शनिवारी घडली.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एका विमानाने शनिवारी अबुधाबीहून रहीम यार खानसाठी उड्डाण घेतलं. पण आकाशात उड्डाणानंतर खराब हवामानामुळे लाहोरच्या भर रस्त्यात उतरवलं.
जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना पुढील प्रवास बसने करण्याच्या सूचना देऊन गंतव्य जागी जाण्यास सांगितलं. पण प्रवाशांनी याला स्पष्ट नकार देत, विमानातून उतरण्यास नकार दिला.
यानंतर कर्मचाऱ्यांनी चक्क विमानातील वातानुकुलित यंत्रं बंद केली. यानंतर प्रवाशांना नाईलाजास्तव विमानातून उतरावं लागलं.
पाकिस्तानी एअरलाईन्सचे लाहोरमध्ये उतरलेले विमान रहीम यार खानपासून 624.5 किमी दूर होतं. यावर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना मुल्तान विमानतळापर्यंत पोहोचण्यास सांगितलं. इथून रहीम यार खान 292 किमी दूर होतं.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानातील अनेक भागात वादळी परिस्थितीसह धुक पडलं आहं. यामुळे वेगवेगळ्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement