एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उरी हल्ला भारतानेच घडवून आणला, पाक संरक्षण मंत्री पुन्हा बरळले
इस्लामाबादः पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी उरी हल्ल्याची योजना भारतानेच आखली होती, असं वादग्रस्त विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. डॉन न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ख्वाजा आसिफ यांनी मुक्ताफळं उधळली आहेत.
काश्मीरप्रश्नावर भारतच गंभीर भूमिका घेत नसल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे. भारताविरोधात अनेक पुरावे पाकिस्तानकडे आहेत, ज्यावरुन भारताची दुटप्पी भूमिका दिसून येते, अशी मुक्ताफळे आसिफ यांनी उधाळली.
परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांनी केलेल्या भाषणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा चेहरा उघडा पडल्याने त्यांचं भारतावर आरोपसत्र सुरु झालं आहे. यापूर्वी आसिफ यांनी एका टीव्ही मुलाखतीत भारतावर आण्विक हल्ला करण्याची धमकी दिली होती.
जागितक पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यावरही आसिफ यांनी टिप्पणी केली. भारताला पाकिस्तानवर आरोप लावून कोणत्याही देशाचं समर्थन मिळालेलं नाही. याऊलट पाकिस्तानला चीनने जाहीर पाठिंबा दिला आहे, असं आसिफ यांनी सांगितलं.
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मोहीम राबवली आहे. पण काही ठराविक देशांच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला दहशतावादी राष्ट्र घोषित केलं जाऊ शकत नाही, असंही विधान आसिफ यांनी केलं.
संबंधित बातम्याः
पाकिस्तानमधील 'सार्क' परिषदेवर भारताचा बहिष्कार
सिंधू करारावरुन घाबरलेल्या पाकची वर्ल्ड बँकेकडे धाव
पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी
पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या भारताच्या मोहिमेला पहिलं यश!
भारतीय लष्कर सक्षम, आता वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू: लेफ्टनंट जनरल
उरीत आतापर्यंत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान शहीद
पाकिस्तानला घेरण्यासाठी पंतप्रधान मोदींचा 'कमांडो प्लॅन'
दहशतवाद्यांनो, उरी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही : मोदी
खून और पानी एक साथ नही बह सकता, पंतप्रधानांची कडक भूमिका
पाकिस्तानची पोलखोल, घुसखोरीसाठी लष्कराकडूनच मदत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement