एक्स्प्लोर

काय म्हणता? तब्बल 132 कोटींची फॅन्सी नंबर प्लेट, महाराष्ट्रात गाड्यांसाठी फॅन्सी नंबरचा दर माहितीय का?

या कारचा नोंदणी क्रमांकामध्ये F1 व्यतिरिक्त इतर कोणतेही अक्षर वापरले गेलेले नाही. जगातील कोणत्याही वाहनाचा हा सर्वात लहान नोंदणी क्रमांक आहे.

Number Plate : प्रत्येकासाठी आपली कार खास असतेच आणि ती आणखी खास दिसावी असं वाटत असतं. कारण आपली गाडी पाहिल्यावर आत बसलेली व्यक्ती ही खास व्यक्ती असावी असा अंदाज लोकांनी बांधावा असा अनेकांचा प्रयत्न असतो. बरेच लोक त्यांच्या कारमध्ये बदल करुन ती वेगळी मॉडिफाय करतात. तर बरेचसे लोक वाहनाचा व्हीआयपी क्रमांक खरेदी करतात. 
 
काही मंडळी एकदम अनोखा नंबर निवडतात तर जण अक्षरशः मनोरंजक नंबर निवडून तो रेडिअमने छान पद्धतीने करतात. तर बरेच लोक त्यांच्या भाग्यवान क्रमांक किंवा वाढदिवस इत्यादीशी संबंधित नंबर निवडतात. 
 
भारतातही व्हीआयपी नंबर प्लेट्सची वेगळीच क्रेझ आहे. ताई, दादा, भाऊ, आडनावशी संबंधित आकडे निवडतात आणि तशी नंबरप्लेट तयारही करुन घेतात. ही अशी वेगळी नंबर प्लेट लावण्यासाठी किंबहुना असे नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट कोणती आहे आणि तिची किंमत काय आहे.

जगातील सर्वात महाग कार क्रमांक F1 आहे. त्याची किंमत जवळपास 132 कोटी रुपये आहे. F1 नंबर प्लेट फॉर्म्युला 1 रेसिंग, जगभरातील सर्वात प्रसिद्ध मोटर स्पोर्ट्स इव्हेंटचे प्रतिनिधित्व करते. या खास नंबर प्लेटसाठी ब्रिटनमधील एका व्यक्तीने एवढी मोठी रक्कम खर्च केली आहे. युनायटेड किंगडममध्ये F1 नोंदणी क्रमांक प्लेट नेहमीच लोकप्रिय आहे. इतकंच नव्हे तर हा क्रमांक मर्यादित काळासाठीच दिला जातो हे विशेष !

ही संख्या विशेष आहे

विशेष बाब म्हणजे या नोंदणी क्रमांकामध्ये F1 व्यतिरिक्त इतर कोणतेही अक्षर वापरले गेलेले नाही. जगातील कोणत्याही वाहनाचा हा सर्वात लहान नोंदणी क्रमांक आहे. ही नोंदणी बुगाटी वेरॉन, मर्सिडीज-मॅकलारेन एसएलआर इत्यादी अनेक उच्च दर्जाच्या कारवर दिसून आलेली आहे.

2008 लिलाव
सुरुवातीला ही नोंदणी प्लेट 1904 नंतर एसेक्स सिटी कौन्सिलकडे होती. तो नंतर 2008 मध्ये लिलावासाठी ठेवण्यात आला होता. सध्या हा क्रमांक यूकेस्थित कार मॉडिफिकेशन कंपनी कान डिझाईनचे मालक अफजल खान यांच्याकडे आहे. त्याने हा नंबर त्याच्या बुगाटी वेरॉनसाठी विकत घेतला आणि यासाठी सुमारे 132 कोटी रुपये देण्यात आले.
 
महाराष्ट्रात फॅन्सी नंबरसाठी किती किंमत?
 
आपल्या राज्यात महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम आर 54 अंतर्गत, 5 फेब्रु. 2002 पासून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत नव्या व्हीआयपी क्रमांकासाठीचे अर्ज स्वीकारले जातात. व्हीआयपी नोंदणी क्रमांक मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते दु. 2.30 या वेळेत रोख भरणा अवधीत विहित शुल्क भरावं लागतं. एकापेक्षा जास्त अर्जदारांनी एकाच नोंदणी क्रमांकाची मागणी केल्यास लिलावाव्दारे तो नोंदणी क्रमांक प्रदान केला जातो. अशा क्रमांकाचे आरक्षण कायम राहातं, मात्र ते केवळ 30 दिवसांसाठी वैध राहातं. मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालयात बिगर परिवहन मालिकेतील संबंधित लिपिक कोऱ्या कागदावरील सर्व अर्ज स्वीकारले जातात. सर्व व्हीआयपी नोंदणी क्रमांकाचे तपशील त्याचे शुल्क जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर  https://transport.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला माहिती मिळू शकेल
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget