North Korea News: उत्तर कोरिया उपासमारीच्या मार्गावर! लोकं आत्महत्या करण्यास प्रवृत्त : UN रिपोर्ट
North Korea News: उत्तर कोरिया आज गंभीर उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे लोकं आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
North Korea News: उत्तर कोरिया देश अण्वस्त्र चाचण्या आणि अमेरिकेसोबतच्या शाब्दिक चकमकींमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र एवढा मोठ्या देशाशी शत्रुत्व आणि एवढ्या महागड्या अण्वस्त्र चाचण्या घेणाऱ्या देशातील जनता उपासमारीसारख्या संकटाला तोंड देत असेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. कोविड -19 चा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे आणि जागतिक संबंध बिघडल्यामुळे उत्तर कोरिया आज गंभीर उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे लोकं आत्महत्या करण्यास हतबल झाली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. एकाकी झालेल्या ईशान्य आशियाई देशाच्या स्वतंत्र संयुक्त राष्ट्राच्या अन्वेषकाने सांगितले की उत्तर कोरिया जागतिक समुदायापासून आता जेव्हढा एकाकी दिसत आहे, तेव्हढा पूर्वी कधीही वेगळा राहिला नाही. "देशाअंतर्गत लोकांच्या मानवी हक्कांवर जबरदस्त परिणाम झाला आहे".
मुले आणि वृद्धांसाठी उपासमारीचा धोका - संयुक्त राष्ट्र
टॉमस ओजिया क्विंटाना यांनी यूएन जनरल असेंब्लीच्या मानवाधिकार समितीला आणि आधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की उत्तर कोरिया अन्न संकटाचा सामना करत आहे. लोकांच्या जीवनमानावर परिणाम झाला असून मुले आणि वृद्धांना उपासमारीचा धोका आहे. ते म्हणाले की राजकीय कैद्यांच्या छावण्यांमध्ये अन्नधान्याच्या तुटवड्याबद्दल ते "खूप चिंतित" आहेत.
डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (DPRK) ने साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सीमा बंद केल्या, ज्याचा उत्तर कोरियाच्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला, कारण देशात आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय पुरवठ्याचा अभाव आहे.
लोक देशातून स्थलांतरित होत आहेत - संयुक्त राष्ट्र
ते म्हणाले की कोविड -19 रोखण्यासाठी डीपीआरके सरकारच्या या आत्मघातकी पावलामुळे लोक आत्महत्या करत असून देश सोडून पळून जात आहेत. डीपीआरकेमध्ये मानवाधिकारांवरील संयुक्त राष्ट्राचे विशेष अन्वेषक म्हणून सहा वर्षांनंतर महासभेला दिलेल्या त्यांच्या अंतिम अहवालात क्विंटाना म्हणाले, की "हालचालीच्या स्वातंत्र्यावरील निर्बंध आणि राष्ट्रीय सीमा बंद केल्याने बाजारातील क्रियाकलाप विस्कळीत झाले आहेत, ज्यामुळे लोकांना अन्नासोबत मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे.