North Korea Missile Test: उत्तर कोरियाने दोन क्रूझ क्षेपणास्त्रे डागली; दक्षिण कोरियाचा दावा
North Korea Missile Test : उत्तर कोरियाने दोन क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी केली असल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.
North Korea Missile Test : उत्तर कोरियाने दोन क्रूझ क्षेपणास्त्रे डागली (North Korea Missile Test) असल्याचा दावा दक्षिण कोरियाने (South Korea) केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-येओल यांच्या कार्यकाळास शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. मागील काही महिन्यांपासून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी सुरू आहे.
दक्षिण कोरियातील स्थानिक वेळेनुसार, बुधवारी सकाळी ही क्षेपणास्त्र चाचणी केली. उत्तक कोरियाने ओंचॉन प्रांताच्या पश्चिम भागातील समुद्राजवळ ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. अमेरिका आणि दक्षिण कोरियन लष्कराचे अधिकारी या क्षेपणास्त्र चाचणीचे अधिक विश्लेषण करत आहेत.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने मंगळवारपासून चार दिवसीय संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. हा लष्करी सराव हा 22 ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत होणाऱ्या एका लष्करी कवायतीच्या अनुषंगाने केला जात आहे.
...तर उत्तर कोरियाला मदतीचा हात, दक्षिण कोरियाचे आश्वासन
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-येओल यांनी म्हटले की, उत्तर कोरियाने अण्वस्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम थांबवल्यास आणि असलेली अण्वस्त्रे नष्ट केल्यास दक्षिण कोरिया आर्थिक मदतीचा हात देण्यास तयार आहे.
उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी सुरूच
जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणींचा धडाका लावला होता. एकाच महिन्यात सात क्षेपणास्त्र चाचणी उत्तर कोरियाने केली होती. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या करत असल्याचा दक्षिण कोरियाने म्हटले होते.
आण्विक हल्ल्यापासून मागे हटणार नाही: उत्तर कोरिया
दक्षिण कोरिया अथवा अमेरिकेने उत्तर कोरियाला आव्हान दिल्यास ते अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून मागे हटणार नाहीत, असा इशारा उत्तर कोरियाने यापूर्वी अनेकदा दिला आहे. एप्रिल महिन्यात उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांची बहीण आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्या किम यो जोंग यांनी आमच्या देशाविरोधात दक्षिण कोरियाने आगळीक केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: