एक्स्प्लोर

लेझर तंत्रज्ञानात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या संशोधकांना यंदाचं भौतिकशास्त्राचं नोबेल

डोना स्टिरकलँड यांच्या रुपाने भौतिकशास्त्राचं नोबेल तब्बल 55 वर्षांनंतर महिलेला मिळालं आहे.

स्वीडन : लेझर तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना विभागून भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतील आर्थर अश्किन, फ्रान्सचे जेरार्ड मोउरो आणि कॅनडाच्या डोना स्टिरकलँड यांना विभागून यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर झाला आहे. या तिघांच्या संशोधनामुळे प्रकाशाची किरणे डोळ्यांच्या सर्जरीपासून मायक्रो-मशीनपर्यंत उपकरणासारखी वापरली जाऊ लागली. या तिन्ही शास्त्रज्ञांमुळे लेझर फिजिक्समध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडलं, असे पुरस्कार समितीने नमूद केले आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ आर्थर अश्किन यांना पुरस्काराची निम्मी रक्कम मिळेल, तर उर्वरित निम्मी रक्कम मोउरो आणि स्टिरकलँड यांना समसमान विभागून दिली जाईल. विशेष म्हणजे, डोना स्टिरकलँड यांच्या रुपाने भौतिकशास्त्राचं नोबेल तब्बल 55 वर्षांनंतर महिलेला मिळालं आहे. भौतिकशास्त्राचं नोबेल जाहीर झाल्यानंतर आणखी एका विशेष गोष्टीची नोंद झाली, ती म्हणजे के. आर्थर अश्किन हे सर्वात वयस्कर नोबेल विजेते ठरले आहेत. दरम्यान, काल (1 ऑक्टोबर) शरीरविज्ञानशस्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर झालं. कॅन्सर अर्थात कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. कॅन्सर थेरपीतील महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं. जेम्स पी अलीसन यांनी प्रोटीनचा अभ्यास करुन रोगप्रतिकार प्रणालीबाबत महत्त्वाचं संशोधन केलं. अलीसन आणि तासुकू होन्जो यांनी अशी थेरपी विकसित केली आहे, ज्यामुळे शरिरातील पेशींमधील रोगप्रतिकारक प्रणालीला कॅन्सर ट्यूमरशी लढण्यासाठी सक्षम केलं जातं. कॅन्सर थेरपीबाबतच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल या दोघांचा सन्मान करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget