एक्स्प्लोर
ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके, पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना साहित्याचं नोबेल
मागील वर्षी लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे 2018 च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा स्थगित केली होती.
स्टॉकहोम : साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. 2018 साठी साहित्याचा नोबेल पुरस्कार पोलिश लेखिका ओल्गा टोकार्झुक आणि 2019 मधील नोबेल पुरस्कार ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना जाहीर झाला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये स्विडीश अकादमीने आज (10 ऑक्टोबर) याची घोषणा केली. मागील वर्षी लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे 2018 च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा स्थगित केली होती.
वैद्यकीय क्षेत्रातील तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर साहित्याच्या नोबेल पुरस्कारशी संबंधित गोष्टी - 1901 पासून 2017 पर्यंत 110 नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत. 114 साहित्यिकांना सन्मानित करण्यात आलं आहे. सर्वाधिक इंग्लिश भाषेसाठी (23 वेळा) साहित्याचा नोबेल देण्यात आला आहे. - साहित्याचा नोबेल चार वेळा दोन साहित्यिकांना संयुक्तरित्या देण्यात आला आहे. 1914, 1918, 1935, 1940,1941, 1942 आणि 1943 मध्ये याची घोषणा झाली नाही. - ब्रिटीश पत्रकार रुडयार्ड किपलिंग (तेव्हा 41 वर्ष) हे साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण साहित्यिक ठरले. त्यांना 1907 मध्ये 'जंगल बुक'साठी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता. - तर साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात ज्येष्ठ साहित्यिक या ब्रिटनच्या डोरिस लेसिंग (88 वर्ष) होत्या. त्यांना 2007 मध्ये हा पुरस्कार मिळाला. - 14 लेखिकांचा साहित्याच्या नोबेल पुरस्काराने सन्मान झाला आहे. नोबेल मिळवणाऱ्या स्वीडिश लेखिका सेलमा लेगरलोफ या पहिल्या साहित्यिका होत्या, त्यांना 1909 मध्ये हा पुरस्कार प्रदान केला होता. - भारतातील बंगाली साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये 'गीतांजली' या काव्य संग्रहासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला. नोबेल पुरस्कार मिळवणारे टागोर हे भारतातीलच नाही तर आशियातील पहिले व्यक्ती होते. - मागील वर्षी लैंगिक छळाचा प्रकरणामुळे 2018 चा साहित्याच्या नोबेलची घोषणा अकादमीने स्थगित केली होती. त्यामुळे यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन साहित्यिकांना देण्यात आला.BREAKING NEWS: The Nobel Prize in Literature for 2018 is awarded to the Polish author Olga Tokarczuk. The Nobel Prize in Literature for 2019 is awarded to the Austrian author Peter Handke.#NobelPrize pic.twitter.com/CeKNz1oTSB
— The Nobel Prize (@NobelPrize) October 10, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement