(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nobel Peace Prize 2021: यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना जाहीर
Nobel Peace Prize 2021: फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांना 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
Nobel Peace Prize 2021: यंदाचा प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला. फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा (Maria Ressa) आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह (Dmitry Muratov) यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांच्या संघर्षासाठी 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रीस-अँडरसन यांनी शुक्रवारी विजेत्यांची घोषणा केली.
तत्पूर्वी, गुरुवारी साहित्यातील नोबेल पारितोषिक कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना प्रदान करण्यात आले. कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना वसाहतवादाचे परिणाम आणि संस्कृती आणि खंडांमधील अंतरांमधील निर्वासितांच्या परिस्थितीचे चित्रण केल्याबद्दल साहित्यातील 2021 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.
Noble Prize | स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
निर्वासित म्हणून आले होते इंग्लंडला
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते अब्दुलरझाक गुर्ना यांच्या दहा कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा प्रकाशित झाल्या आहेत. निर्वासितांच्या समस्या त्यांच्या लेखनाचा प्रमुख विषय आहे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी इंग्रजीमध्ये लिहायला सुरुवात केली. वास्तवात त्यांची लेखनाची भाषा सुरुवातीला स्वाहिली होती. पुढे त्यांनी इंग्रजी हे आपले लेखनाचे माध्यम बनवले. अब्दुलरझाक गुर्ना यांचा जन्म 1948 मध्ये झाला. ते झांझीबार बेटावर मोठे झाले. पण, 1960 च्या उत्तरार्धात शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये आले. सेवानिवृत्तीपूर्वी, ते केंट विद्यापीठ, कॅटरबरीमध्ये इंग्रजी आणि उत्तर -औपनिवेशिक साहित्याचे प्राध्यापक होते.
पुरस्काराचे स्वरुप काय आहे?
नोबेल पुरस्कारांतर्गत, एक सुवर्णपदक, एक कोटी स्वीडिश क्रोनर (सुमारे 8.20 कोटी रुपये) दिले जाते. स्वीडिश क्रोनर हे स्वीडनचे चलन आहे. हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावर आहे.
नोबेल पुरस्कार काय आहे?
स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या पाचव्या पुण्यतिथीपासून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. नोबेल यांनी स्फोटक डायनामाइटचा शोध लावला होता. त्यांचा आविष्कार युद्धात वापरला गेल्यामुळे ते खूप दुःखी झाले. याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी नोबेल पारितोषिकांची त्यांच्या मृत्यूपत्रात व्यवस्था केली होती. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिले आहे की त्याची बहुतांश संपत्ती एका फंडात ठेवली जाईल आणि त्याचे वार्षिक व्याज मानवजातीसाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना पुरस्कृत केले जावे.