एक्स्प्लोर
स्वित्झर्लंडमध्ये नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीशी संबधित चार बँक खाती गोठवली
पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेला भामटा नीरव मोदीविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) मोठी पावलं उचलली आहेत.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेला भामटा नीरव मोदीविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) मोठी पावलं उचलली आहेत. ईडीने स्वित्झर्लंडमधील नीरव मोदी आणि त्याची बहीण पूर्वी मोदी या दोघांशी संबधित 4 बँक खाती गोठवली आहेत. या चार बँक खात्यांमध्ये तब्बल 283.16 कोटी रुपये जमा आहेत. स्विस बँकेने यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे.
स्विस बँकेने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भारतातील तपास यंत्रणा ईडीने नीरव मोदी आणि पूर्वी मोदी यांची चार खाती गोठवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार ही चारही खाती गोठवण्यात आली आहेत.
पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदी याला 19 मार्च रोजी लंडन येथे अटक करण्यात आले होते. अटकेनंतर त्याला इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात सादर करण्यात आले असून या कोर्टात त्याच्यावर सध्या खटला सुरु आहे. अटकेनंतर नीरवने दोन वेळा जामीन अर्ज दाखल केला होता परंतु कोर्टाने दोन्ही वेळा त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
नीरव मोदी जानेवारी 2018 पासून भारतातून फरार झाला आहे. नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआय तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement