एक्स्प्लोर
Advertisement
इंग्लंडचे नवे पंतप्रधान बोरिस भारताचे जावई
पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारतासोबत संबंध सक्रिय आणि मजबूत करण्याबाबत भाष्य केलं आहे. प्रधानमंत्री मोदी आणि भारतासोबत माझे खाजगी संबंध आहेत. भारत आणि ब्रिटनच्या संबंधांवर बोरिस नेहमीच सकारात्मक राहिले आहेत.
लंडन : इंग्लंडच्या नव्या पंतप्रधानपदी बोरिस जॉनसन विराजमान झाले आहेत. बोरिस यांचे भारताशी एक अनोखे आणि जवळचे नाते आहे. बोरिस हे भारताचे जावई आहेत. प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंह यांची पुतणी मारियाशी बोरिस यांनी लग्न केलं होतं. दोघांना चार मुलं देखील आहेत. 1993 साली लग्न झालेल्या बोरिस आणि मारिया यांचा चार मुलं झाल्यानंतर घटस्फोट झाला आहे.
मागील वर्षी 2018 मध्ये बोरिस आणि मारिया 25 वर्ष संसार केल्यानंतर विभक्त झाले. बोरिस अनेकदा भारतामध्ये अनेकदा येऊन गेले आहेत. बोरिस यांनी अनेकदा आपल्या भाषणात बोलताना मी भारताचा जावई आहे असा उल्लेख केला आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारतासोबत संबंध सक्रिय आणि मजबूत करण्याबाबत भाष्य केलं आहे. प्रधानमंत्री मोदी आणि भारतासोबत माझे खाजगी संबंध आहेत. भारत आणि ब्रिटनच्या संबंधांवर बोरिस नेहमीच सकारात्मक राहिले आहेत. जेव्हा मी पंतप्रधान मोदींसोबत असतो तेव्हा मी ब्रिटन आणि भारत या दोन आधुनिक लोकशाही देशातील संबंधावर चर्चा करतो. दोन्ही देशातील व्यापार आणि समृद्धीचा प्रचार करण्यासाठी, जागतिक सुरक्षा आणि आणखी काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करावे, असेही ते म्हणाले.
बोरिस यांची घटस्फोटित पत्नी मारिया यांची आई दीप सिंग यांनी बीबीसीचे प्रसिद्ध पत्रकार चार्ल्स विलर यांच्याशी लग्न केले होते. 2008 साली या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर दीप यांनी खुशवंत सिंग यांचे धाकटे बंधू दिलजीत सिंग यांच्याशी लग्न केले. पत्नी मारिया आणि आपल्या तीन मुलांबरोबर बोरिस हे मागील वर्षी भारतामध्ये रणथंबोर अभयारण्य पाहण्यासाठी आले होते, अशी माहिती खुशवंत यांचे पुत्र राहुल सिंग यांनी दिली आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होत असल्यामुळेच बोरिस यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement