एक्स्प्लोर
'टाइम'च्या सर्व्हेत मोदींना सर्वाधिक पसंती, ट्रम्प, ओबामांना मागे टाकलं!
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध 'टाइम' मॅग्झिनचा यंदाचा 'पर्सन ऑफ द ईयर' पुरस्कार पटकावला आहे. या ऑनलाईन सर्व्हेत मोदींना वाचकांची सर्वाधिक पसंती मिळाली.
महत्त्वाचं म्हणजे मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा यांना मागे टाकलं.
पुरस्काराच्या या यादीत मोदी सुरुवातीपासूनच अव्वलस्थानी होते. त्यांनी आपलं हे स्थान शेवटपर्यंत कायम राखलं. मोदींना सर्वाधिक 18 टक्के पसंती मिळाली.
तर ओबामा, ट्रम्प आणि विकिलिक्सच्या ज्युलियन असांजला मिळून 7 टक्के पसंती मिळाली.
या यादीत मोदींनी ओबामा आणि ट्रम्प यांच्याशिवाय रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चीनपिंग यांनाही पछाडीवर टाकले आहे.
जगभरात स्वत:चा दबदबा निर्माण केलेल्या प्रसिद्ध व्यक्तीचा गौरव ‘टाइम्स’च्यावतीने दरवर्षी केला जातो. गेल्यावर्षी या यादीत जर्मनीचे चान्सलर अँजेला मर्केल यांनी बाजी मारली होती. पण चालू वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अव्वल स्थान गाठले आहे.
विशेष म्हणजे, सलग चार वर्षे या यादीत स्थान मिळवण्याचा विक्रमही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
या यादीसाठी एकूण 30 व्यक्तींची नावे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये व्हिसलब्लोअर ते खेळाडू आणि पॉप सिंगरपर्यंत सर्वांचाच समावेश होता. राजकीय क्षेत्र सोडून सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांना दोन टक्के, तर अॅप्पलचे सीईओ टिम कूक, प्रसिद्ध गायक बियॉन्से नॉलेस तसेच ब्रिटेनच्या पंतप्रधान थेरेसा यांना प्रत्येक एक टक्के जनतेने पाठिंबा दिला आहे.
या यादीच्या निश्चितीवर ‘टाईम्स’च्या संपादक मंडळाचा अंतिम निर्णय असला, तरी ‘टाईम पर्सन ऑफ द ईअर’च्या ठरवण्यासाठी वाचकांकडूनही ऑनलाईन मते मागवली जातात. यामधे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाजी मारत, सर्वाधिक मते मिळवली आहेत.
संबंधित बातमी
ना ओबामा, ना ट्रम्प, अमेरिकेतील 'टाईम'च्या यादीत मोदीच अव्वल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement