मोदींचा आफ्रिका दौरा, रवांडा देशाला 200 गायींची भेट
मोदी रवांडामध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते वेरू मॉडेल गावामध्ये असताना एका सोहळ्यादरम्यान मोदींनी ही दोनशे गायींची भेट दिली.

रावंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांनी रवांडा देशातील कागली शहराला दोनशे गायी भेट दिल्या आहेत. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी कुपोषित बालकांसाठी सुरू केलेल्या उपाययोजनांना मदत करण्यासाठी मोदींनी ही अनोखी भेट दिली आहे.
प्रत्येक कुटुंबामागे एक गाय अशी योजना कागमे यांनी 2006 साली सुरू केली. रावंडातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि दुग्धव्यवसायाला बळकटी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
मोदी रवांडामध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते वेरू मॉडेल गावामध्ये असताना एका सोहळ्यादरम्यान मोदींनी ही दोनशे गायींची भेट दिली.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
Transforming lives in rural areas! More images of cow donation function under Rwanda's Girinka programme. Rwandan President @PaulKagame joined PM @narendramodi at the event. pic.twitter.com/xlVGYmrXNT
— Raveesh Kumar (@MEAIndia) July 24, 2018























