(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Myanmar Landslide : म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 70 हून अधिक लोक बेपत्ता
Myanmar Landslide : म्यानमारमधील एका खाणीत बुधवारी झालेल्या भूस्खलनात 70 हून अधिक लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. भूस्खलनग्रस्त भागात मदत आणि बचाव पथकांकडून बचावकार्य सुरु आहे.
Myanmar Landslide : म्यानमारमध्ये एका खाणीत (Mine) भीषण अपघात झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर म्यानमारमधील एका खाणीत बुधवारी झालेल्या भूस्खलनात (Landslide) किमान 70 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. भूस्खलनाच्या प्रवण भागात मदत आणि बचाव पथकांकडून बचावकार्य सुरु आहेत. बचाव पथकातील एका सदस्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाले ज्यामध्ये सुमारे 70 ते 100 लोक बेपत्ता आहेत.
भूस्खलनामुळे 70 हून अधिक लोक बेपत्ता
भूस्खलनामुळे अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे 200 बचाव कर्मचारी मदतकार्यात व्यस्त आहेत. जवळच्या तलावात बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी काही लोक बोटींचा वापर करत आहेत. खाणीत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, अद्याप जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास कोसळली दरड
काचिन नेटवर्क डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या (Kachin Network Development Foundation) एका अधिकाऱ्याने सांगितले की, काचिन राज्यातील (Kachin State) हपाकांत भागात (Hpakant Area) पहाटे चार वाजताच्या सुमारास भूस्खलन झाली आणि खाण कचरा टाकल्याने सुमारे ८० लोक तलावात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे. हापाकांत परिसर हे म्यानमारच्या जेड उद्योगाचे केंद्र असल्याचे म्हटले जाते.
दरवर्षी भूस्खलनामुळे लोकांचा मृत्यू होतो
हापाकांत येथे खराब नियमन केलेल्या खाणींमध्ये प्राणघातक भूस्खलन आणि इतर अपघात होणे ही सामान्य बाब झाली आहेत. गेल्या आठवड्यातही भूस्खलनात सहा जणांचा मृत्यू झाला होता. खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर काम करतात. नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की यांच्या बेदखल सरकारने 2016 मध्ये सत्तेवर आल्यानंतर उद्योगाबाबत अनेक आश्वासने दिली होती, परंतु काहीही झाले नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये, हापाकांत तलावात खाण कचरा पडल्याने 170 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते, त्यापैकी बरेच स्थलांतरित होते.
इतर बातम्या :
- Omicron : देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका, पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक
- Bank Recruitment : कनिष्ठ अधिकारी पदाच्या 300 रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज
- Omicron : बिल गेट्स म्हणतात ओमायक्रॉन लवकरच संपुष्टात येईल पण...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha