Coronavirus | गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजारहून अधिक रुग्ण, 1354 जणांचा मृत्यू
जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर गेला आहे. तर 11 हजार 385 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरातील 177 देशांमध्ये थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजारावर नवे रुग्ण आढळले असून 1354 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायतक बाब म्हणजे एकट्या इटलीत गेल्या 24 तासात तब्बल 627 जणांचा बळी गेला आहे. इटलीत 2 मार्चला 52 मृत होते, गेल्या 19 दिवसात इटलीमध्ये 3950 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृत्यांचा आकडा एक हजारहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात स्पेनमध्ये 262 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 13 दिवसात 1063 जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर गेला आहे. तर 11 हजार 385 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन 92 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. तर सात हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती अद्याप गंभीर आहे.
कोरोनामुळे विविध देशांमधील मृतांचा आकडा
देश | मृत्यू | एकूण रुग्ण |
चीन | 3,255 | 81,000 |
इटली | 4032 | 47,021 |
स्पेन | 1093 | 21,510 |
इराण | 1433 | 19,644 |
फ्रान्स | 450 | 12,612 |
अमेरिका | 258 | 19,640 |
इंग्लंड | 177 | 3,983 |
दक्षिण कोरिया | 102 | 8,799 |
भारतात कोणत्या राज्यात किती कोरोनाग्रस्त रूग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रामध्ये या जीवघेण्या विषाणूचे सर्वाधिक 52 रूग्ण आहेत. यामध्ये तीन परदेशी लोकांचा समावेश आहे. यानंतर केरळमध्ये 28 संसर्गजन्य लोक असून दोन विदेशी नागरिक आहेत. या दोन राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये 22, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, दिल्लीमध्ये 17, लदाखमध्ये 10, तेलंगणामध्ये 17, राजस्थानमध्ये 1, जम्मू काश्मिरमध्ये चार, तमिळनाडूमध्ये 3, ओडीशामध्ये 2, पंजाबमध्ये 2, उत्तराखंडमध्ये 3. आंध्रप्रदेशमध्ये 3, बंगालमध्ये 3, चंदिगढमध्ये एक, पद्दुचेरीमध्ये एक, गुजरातमध्ये 5 आणि छत्तीसगढमध्ये एक कोरोनाग्रस्त आहे.
रविवारी भारतात 'जनता कर्फ्यु' कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.संबंधित बातम्या
- Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये होम कॉरंटाईनचे उल्लंघन; तरुणाचा कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क
- coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती
- Coronavirus | कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सक्षम, केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार