एक्स्प्लोर
Advertisement
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींकडून ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट
हॅम्बर्ग : देशातल्या प्रमुख बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याभोवती कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे. कारण विजय मल्ल्याप्रकरणी मोदींनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली.
भारतात आर्थिक गुन्हे करून लंडनमध्ये लपलेल्या गुन्हेगारांचं प्रत्यार्पण करण्यासंदर्भात मोदी आणि थेरेसा यांच्यामध्ये चर्चा झाली. जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये जी-20 देशांच्या परिषदेनिमित्त दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यामुळे आता मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
विजय मल्ल्यानं आयडीबीआय, स्टेट बँक यांसारख्या बँकांकडून 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पळाला. त्याच्यावर खटलाही सुरू करण्यात आला आहे, मात्र आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट थेरेसा यांनाच मदतीचं आवाहन केलं.
दरम्यान, गेल्या महिन्यात बर्मिंघममध्ये मॅच पाहायला आलेल्या मल्ल्याला एबीपी न्यूजच्या पत्रकारानं गाठलं. मात्र यावेळीही मल्ल्यानं एबीपीच्या पत्रकाराला उद्धट उत्तरं दिली.
यावेळी पत्रकारानं सर्वात आधी मल्ल्याच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं मल्ल्यानं टाळलं. त्यानंतर पत्रकारानं मल्ल्याला क्रिकेट मॅच एन्जॉय केली का? अशी विचारणा केली. त्यावर मी मॅच एन्जॉय केली, पण भारतीय संघाच्या निकालांवर समाधानी नसल्याचं सांगितल.
त्यानंतर एबीपी न्यूजच्या पत्रकारानं मल्ल्याला भारतात पुन्हा कधी येणार असा प्रश्न विचारला, यावर तुम्ही इथे मॅच पाहायला आला आहात, की मी भारतात कधी येणार हे जाणून घ्यायला असा उद्धट प्रतिप्रश्नच मल्ल्यानं पत्रकाराला विचारला.
संबंधित बातम्या
लंडनमध्ये विजय मल्ल्या 'एबीपी'च्या कॅमेऱ्यात कैद, पत्रकाराला मल्ल्याची उद्धट उत्तरं
VIDEO : विराट कोहलीच्या कार्यक्रमात विजय मल्ल्या
विजय मल्ल्या भारतात परतणार का? लंडनमध्ये सुनावणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement