Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! सियालकोटमध्ये मोठा स्फोट, लष्करी तळावर भीषण आग
Pakistan Blast: पाकिस्तानमधील (Pakistan) सियालकोटमध्ये (Sialkot) काही मोठे हल्ले (Blast) झाले आहेत. या हल्यामुळं लष्करी तळावर (Army Base) भीषण आग लागल्याची माहिती समोर आलीय.

Pakistan Blast: पाकिस्तानमधील (Pakistan) सियालकोटमध्ये (Sialkot) मोठा स्फोट (Blast) झाला आहे. या स्फोटामुळं लष्करी तळावर (Army Base) भीषण आग लागल्याची माहिती समोर आलीय. एएनआय वृत्त संस्थेनं याबाबत माहिती दिलीय. या हल्लानंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. महत्वाचं म्हणजे, हा स्फोट नेमका कशामुळं झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे दारूगोळ्याचं साठवण केली जात असल्याचं समजत आहे. या स्फोटामध्ये किती नुकसान झाले? याची महिती समोर आली नाही. पण या स्फोटाची तीव्रता लक्षात घेता येथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या स्फोटामागं नेमका कोणाचा हात आहे? यामागचं सत्य अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ट्वीट-
पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी पेशवरच्या मिया मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला झाला होता. ज्यात 64 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, 200 हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर 2 मार्चला बलुचिस्तान प्रांतातील क्वेटामधील एका पोलीस वाहनाजवळ स्फोट झाला होता. ज्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तिघांचा मृत्यू झाला होता. तर, 24 जण जखमी झाले होते.
हे देखील वाचा-
- World Sparrow Day 2022 : सांगलीत चिमणी संवर्धनाचा अनोखा संदेश, शिक्षकांनी रंगीत खडूंच्या साहाय्याने काढले चिमणीचे हुबेहूब चित्र
- World Sparrow Day 2022 : 'या चिमण्यांनो परत फिरा...', जागतिक चिमणी दिवस स्पेशल रिपोर्ट
- Reserve Bank Of India : अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केली वाढ, RBIच्या पतधोरणावर परिणाम होईल का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
