एक्स्प्लोर
माल्टा विमान अपहरण, सर्व प्रवासी सुरक्षित, अपहरणकर्त्यांचं आत्मसमर्पण

नवी दिल्ली/त्रिपोली : लिबियाच्या अपहरण केलेल्या विमानातील सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली असून अपहरणकर्त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, अशी माहिती माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी दिली आहे. अपहरणकर्त्यांनी अपहरण केल्यानंतर विमान माल्टाच्या विमानतळावर उतरवलं होतं. या विमानात एकूण 118 प्रवासी होते. अपहरणकर्त्यांनी हे विमान उडवण्याची धमकी दिली होती. माल्टाच्या पंतप्रधानांनी देखील विमान हायजॅक झाल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. आफ्रिकिया एअरलाईन्सचं हे विमान लिबियाच्या साभा येथून त्रिपोलीकडे जात होतं. मात्र दोन अज्ञातांनी आपल्याकडे बॉम्ब असल्याचं सांगत विमान हायजॅक केलं. अपहरणकर्त्यांनी अगोदर 65 महिला आणि लहान मुलांना सोडून दिलं. त्यानंतर एक एक करत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर सोडलं. दरम्यान अपहरणकर्त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या, ज्या सध्या गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित बातमी :
लीबियाचं विमान हायजॅक, विमानात 118 प्रवासी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर























