Malala Yousafzai | नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला युसूफझाईचा अॅपलशी करार, महिला आणि बालकांच्या प्रश्नावर डॉक्युमेन्ट्रीज् निर्माण करणार
अॅपल या कंपनीने मलाला युसूफझाईशी एक करार केला असून त्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या प्रश्नावर डॉक्युमेन्ट्रीज् तयार करण्यात येणार आहे.
Malala Yousafzai : नोबेल पुरस्कार विजेत्या पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईने जगप्रसिध्द अॅपल या कंपनीशी एक करार केला आहे. मलालाने महिला आणि बालकांच्या विषयावर केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा घेऊन आता अॅपलकडून जगभरातील महिला आणि बालकांच्या विषयावर डॉक्युमेन्ट्रीज् तयार करण्यात येणार आहेत. मलाला युसुफझाईने मुलींच्या शिक्षणाच्या हक्कावर आवाज उठवल्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. सुदैवाने त्यातून ती बचावली.
अॅपलने आपल्या निवेदनात असं सांगितलंय की, हा करार काही वर्षांसाठी असेल. जगातील लोकांना प्रेरणा देण्याचं काम मलाला युसूफझाईने केलं आहे. त्यामुळे तिच्या अनुभवाचा फायदा घेऊन कंपनीकडून जगभरातील महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर डॉक्युमेन्ट्रीज् तयार करण्यात येतील. त्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या प्रश्नासंबंधी जागरुकता निर्माण करण्यात येईल. यामध्ये बालकांच्यासाठी विशेष अशा अॅनिमेटेड पटांची आणि सीरिजची निर्मीती करण्यात येणार आहे.
Pakistani activist Malala Yousafzai, who won the Nobel Peace Prize as a teenager after surviving a Taliban assassination attempt, has signed a deal with Apple TV+ that will see her produce dramas and documentaries that focus on women and children pic.twitter.com/TBY8tcZfvi
— AFP News Agency (@AFP) March 9, 2021
जगभरातील महिला, बालके यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या तरुण, लेखक, कलाकार यांना मदत करण्याची संधी मला या कराराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे मला खरोखर आनंद झाला आहे अशी भावना 23 वर्षीय मलालाने व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या स्वात व्हॅली या प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि बालकांच्या शिक्षणावर बंदी आणली आहे, त्यांच्या अनेक अधिकारांवर गदा आणली आहे. आता मलाला त्या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवत आहे. 2017 साली वयाच्या केवळ 17 व्या वर्षी तिला शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलंय.
मलाला झाली ऑक्सफोर्डमधून पदवीधर, प्रियांकाने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा