एक्स्प्लोर
Advertisement
मराठमोळे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी!
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर हे आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत. आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल लागला. त्यात वराडकर हे विजयी झाले असून, ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.
लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मतं मिळाली.
आयर्लंडमध्ये 2007 साली झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यानंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले गेले आणि अखेर ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. सिमोन कोव्हिने हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी होते.
लिओ वराडकर कोण आहेत?
लिओ वराडकर. आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदाचे दावेदार. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे. अशोक वराडकर आणि पत्नी मरियम यांचं तिसरं अपत्य.
लिओ सध्या आयर्लंडचे सामाजिक संरक्षण मंत्री आहेत. डबलीनच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून 2003 साली त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. त्यानंतर फाइन गेल या ख्रिश्चन डेमोक्रेटिक पॉलिटिकल पार्टीतर्फे ते राजकारणात आले. विशेष म्हणजे लिओ हे मंत्रीमंडळातले पहिले गे सदस्य आहेत.
2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.
वराडकर कुटुंबियांचं गावात घर आणि बागायती शेती आहे. त्यांची शेती आणि घर हे त्यांचे चुलत बंधू वसंत वराडकर सांभाळतात. लिओची आई मरियम आणि बाबा अशोक वराडकर वर्षातून एक-दोनदा मूळ गावी येतात.
गावी आल्यावर ते मालवणी पाहुणचार स्वीकारतात, त्यांना अजूनही मराठी भाषा, काही कोकणी शब्द बोलता येतात, निवडणूक जिंकल्यास लिओ मूळगावी येऊन देवीचं दर्शन घेणार, असं लिओ यांचे काका वसंत वराडकर सांगतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement