एक्स्प्लोर

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह अतिरेक्यांच्या हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट, 9 ठार, 2800 जखमी; इस्त्रायलचा हात असल्याचा आरोप

Lebanon Pager Blast :  हिजबुल्लाह संघटनेचे सदस्यांकडून संवादासाठी वापरण्यात येणाऱ्या पेजर्समध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता मालिका स्फोट झाले.

Lebanon Pager Blast :  लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या अतिरेक्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाला. त्यात नऊ जणांचा मृत्यू झालाय. तर 2 हजार 800 जण जखमी झाले असल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. जखमींमध्ये इराणच्या राजदुताचाही समावेश आहे. या स्फोटांमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप हिजबुल्लानं केला आहे. गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये संघर्ष सुरु आहे.

हा स्फोट म्हणजे सुरक्षेतली सर्वात मोठी चूक असल्याचंही हिजबुल्लानं म्हटलंय. तसेच इस्रायलला धडा शिकवण्याचा निर्धार देखील हिजबुल्लानं केला आहे. ज्या पेजर्सचा स्फोट झाला ते अत्याधुनिक मॉडेलचे होते. हिजबुल्लानं सुरक्षेच्या कारणावरून स्मार्टफोनच्या ऐवजी पेजर्स खरेदी केले होते. 

एकाच वेळी हजारो पेजर्समध्ये स्फोट

लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी (17 सप्टेंबर) झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या मालिकेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉन मीडियाच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाह आणि इतरांनी पेजरमध्ये केलेल्या मालिका स्फोटांमुळे सुमारे 2,800 लोक जखमी झाले आहेत. 

हिजबुल्लाहने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिजबुल्लाह सदस्य आणि इतरांनी संवादासाठी वापरलेल्या पेजरमध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता स्फोट झाले. या रहस्यमय स्फोटांचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तपासासाठी पथके तैनात

पेजरमधील मालिका बॉम्बस्फोटांच्या तपासासाठी हिजबुल्लाहने पथके तैनात केली आहेत. या मालिकेतील स्फोटामागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पेजर स्फोटाच्या घटनांनंतर जखमींच्या मदतीसाठी रुग्णालयात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

इराणचे राजदूतही जखमी

इराणच्या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी हे पेजरमध्ये झालेल्या मालिका स्फोटात जखमी झाले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लेबनॉनमधील मालिका बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये हिजबुल्लाहचे सैनिक आणि डॉक्टरांचा समावेश आहे.

लेबनॉन पेजर स्फोटामागे इस्रायल?

लेबनॉनमधील पेजरमध्ये झालेल्या मालिका बॉम्बस्फोटासाठी हिजबुल्लाहने इस्रायलवर आरोप केले आहेत. हिजबुल्लाहने पेजरमधील मालिका बॉम्बस्फोटांना सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आहे आणि सर्व पेजर एकाच वेळी ब्लास्ट झाल्याचे म्हटले आहे. काही षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्ला सतत इस्रायली संरक्षण दलांना लक्ष्य करत आहे. गेल्या काही दिवसांत हिजबुल्लाहकडून इस्रायलवर रॉकेट हल्लेही करण्यात आले आहेत. लेबनॉन पेजर स्फोटाबाबत रॉयटर्सने इस्रायली संरक्षण दल (IDF) कडून टिप्पणी मागितली असता, त्यांनी निवेदन देण्यास नकार दिला.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
Embed widget