एक्स्प्लोर

परदेशी नागरिकांच्या नोकऱ्यांबाबत कुवेत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; भारतावर काय परिणाम होणार?

Kuwait Jobs : कुवेत सरकारने देशात नोकरी करणाऱ्या परदेशी कर्मचारी, कामगारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Jobs in Gulf Countries : आखातातील महत्त्वाचा देश असणाऱ्या कुवेतने नोकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कुवेत सरकारने आता देशातील परदेशी कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक कुवेत नागरिकांना नोकरीची संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतच्या एकूण लोकसंख्येत 75 टक्के हे स्थलांतरीत कामगार, कर्मचारी आहे. या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसणार आहे. 

कुवेतमध्ये सरकारी संस्था, शिक्षक, डॉक्टर आणि सेवा क्षेत्रातील नोकऱ्या वगळता इतर सर्व सरकारी क्षेत्रांमधील नोकऱ्यांमधून परदेशी नागरिकांना कमी केले जात आहे. 'अरब न्यूज'ने स्थानिक वृत्तपत्र अल अंबाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कुवेतची रोजगाराशी संबंधित आयोगाने म्हटले की, परदेशी नागरिकांनी सरकारी नोकरीतून कमी करण्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. 

सप्टेंबर 2017 मध्ये आयोगाने विविध सरकारी संस्था आणि कुवेती नागरिकत्व असलेले कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांची संख्या टप्प्या टप्प्याने कमी करणे आणि स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पाच वर्षांत सरकारी नोकऱ्यांचे 'कुवेतीकरण' करण्यात येणार आहे.

वर्ष 2020 मध्ये कुवेतमध्ये एक कायदादेखील तयार करण्यात आला होता. त्यानुसार, परदेशी नागरिकांची संख्या कमी करण्यात येणार असून एकूण लोकसंख्येच्या 30 टक्क्यापर्यंत आणली जाणार आहे. 

कुवेतची एकूण लोकसंख्या ४६ लाख असून त्यापैकी ३५ लाख परदेशी आहेत. कुवेतमध्ये सर्वाधिक भारतीय राहतात. 2020 च्या आकडेवारीनुसार, कुवेतमध्ये 10 लाख भारतीय प्रवासी राहतात जे खाजगी क्षेत्राव्यतिरिक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. 

अलिकडच्या काही महिन्यांत, कोविड-19 मुळे आर्थिक संकटामुळे परदेशी लोकांच्या रोजगारावर मर्यादा घालण्याची मागणी आखाती देशात तीव्र होत आहे. परदेशी नागरिकांबाबतही सरकार कठोर पावले उचलत आहे. कुवेतमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांविरोधातही कारवाई करण्यात येत आहे.

कुवेतच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये कुवेतमधील सुमारे 18 हजार परदेशी लोकांना विविध प्रकरणांमध्ये त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. वर्ष 2018 मध्ये कुवेतने स्थलांतरितांबाबतचे नियम बदलले होते, त्यानंतर शेकडो भारतीय अभियंत्यांना नोकरी गमावून मायदेशी परतावे लागले होते. कुवेत सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका भारतीयांना बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget