एक्स्प्लोर

Japan | वाढत्या आत्महत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जपानमध्ये आता 'मिनिस्टर ऑफ लोनलिनेस'

गेल्या 11 वर्षाच्या तुलनेत जपानमध्ये (Japan) कोरोना काळात सर्वाधिक आत्महत्या (suicide) झाल्याचं दिसून आलंय. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जपानने आता एका स्वतंत्र मंत्रालयाची (Minister of Loneliness) निर्मिती केली आहे.

टोक्यो: कोरोनाच्या काळात गेल्या वर्षी जपानमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. खासकरुन महिलांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी जपानने स्वतंत्र मंत्रालयाची निर्मीती केली असून या खात्याला 'मिनिस्ट्री ऑफ लोनलिनेस' (Minister of Loneliness) असं नाव दिलं आहे.

जपानमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांपेक्षाही आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं. त्यामुळे जपानच्या सरकारमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. जपानच्या लोकांमधील वाढत चाललेला एकाकीपणा आणि त्यांचे समाजापासून असलेले विलगीकरण दूर करण्यासाठी जपानच्या सरकारने मिनिस्ट्री ऑफ लोनलिनेस या मंत्रालयाची निर्मिती केलीय.

जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी तेत्सुशी साकामोटो यांच्याकडे या नव्या मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. तेत्सुशी साकामोटो यांच्याकडे याआधी जपानचा घटता जन्मदर वाढवणे आणि जपानच्या लोकांचे एकाकीपणा दूर करण्यासाठी धोरणं आखण्याची जबाबदारी होती.

Padma Awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंसह 7 जणांना पद्मविभूषण

जपानच्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. कोरोना काळात ज्या आत्महत्या झाल्या त्या गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक होत्या असं सरकारचा एक अहवाल सांगतोय. त्यामुळे हे नागरिक आत्महत्या का करत आहेत आणि त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवण्यात येतील हे पाहण्याची जबाबदारी या नव्या मंत्रालयावर असेल.

ऑक्टोबर 2020 या एका महिन्यात जपानमध्ये 1756 इतके मृत्यू हे कोरोनामुळे झाले होते तर आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या ही त्यापेक्षा जास्त म्हणजे 2153 इतकी होती. त्यामध्ये 879 इतक्या महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. 2019 च्या तुलनेत महिलांच्या आत्महत्येमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जपानच्या नॅशनल पॉलिसी एजन्सीच्या एका अहवालामध्ये सांगण्यात आलंय की एकाकीपणामुळे नागरिकांत हर्ट अटॅक, स्मृतीभंश तसेच इतरही रोग होत आहेत.

Japan PM Resigns | जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे दिला पदाचा राजीनामा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Embed widget