James Webb Space Telescope : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून (James Webb Space Telescope) काढलेली काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ज्यामध्ये टेलिस्कोपच्या प्राथमिक आरशाचा सेल्फी देखील समाविष्ट आहे. हा तारा पृथ्वीपासून 269 प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे. नासा वेब टेलिस्कोपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही सर्व माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, 'वेबने त्याच्या प्राथमिक आरशाचा सेल्फी घेतला, जो बाहेरील इंजिनीअरिंग कॅमेऱ्यातून घेतला गेला नाही तर त्याच्या NIRCam डिव्हाईसच्या आतील बाजूस बसवलेल्या विशेष लेन्सने घेतला गेला आहे.'


यानंतर, त्यांनी असं म्हटलं आहे की, 'तुम्ही जे पाहता ते वेबचे वास्तविक प्राथमिक आरसे आहे, जे त्याच्या लक्षित तारेकडे पाहत आहे. सर्व आरसे ताऱ्याकडे पाहतात पण आरसा चमकत आहे कारण तो ताऱ्याच्या सरळ रेषेत आहे. हे अप्रतिम दिसणारं चित्र पाहून नासानेही कौतुक केलं आहे. NASA टेलिस्कोपचे प्रमुख अन्वेषक आणि ऍरिझोना विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ मार्सिया रीके म्हणाले, "संपूर्ण टीम अत्यंत आनंदी आहे की चित्र कॅप्चर करण्याचा आणि दुर्बिणीच्या संरेखनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे."


दुर्बिणी जशी हवी तशी काम करत असल्याचा पुरावा हे चित्र आहे. सर्व आरसे एका रेषेत नसल्यामुळे ताऱ्याचे चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. नासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फोटो काढण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती.


जेम्स वेब दुर्बिणीबद्दल सांगायचे तर ही दुर्बिण नासाने युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीच्या सहकार्याने तयार केले आहे. नासाच्या या नवीन दुर्बिणीमध्ये सोनेरी रंगाचा आरसाही आहे. या आरशाची रूंदी 21.32 फूट आहे. हे बेरिलियमपासून बनवलेल्या षटकोनाचे 18 तुकडे जोडून तयार केले आहे. प्रत्येक तुकड्यात 48.2 ग्रॅम सोने आहे. त्यामुळे ते परावर्तक म्हणून काम करते.


NASA ने 24 एप्रिल 1990 रोजी हबल टेलिस्कोप लाँच केली. तर जेम्स वेब टेलिस्कोप गेल्या वर्षी 25 डिसेंबरला लाँच करण्यात आली होती.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha