Coronavirus Update : जगभरात कोरोनाचा कहर कायम आहे. त्यातच यूएस संशोधकांच्या पथकाने न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक गटारातील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-2 चे किमान चार 'गुप्त' प्रकार शोधले आहेत, ज्यामुळे कोविड-19 विषाणूचा संसर्ग होतो. मिसूरी विद्यापीठातील आण्विक सूक्ष्मजीवशास्त्र आणि इम्युनोलॉजीचे प्राध्यापक आणि संशोधनाचे सह-संबंधित लेखक मार्क जॉन्सन यांनी सांगितले आहे की, न्यूयॉर्क शहरातील आढळलेल्या 'गुप्त' प्रकारांचा संभाव्यतः प्राण्यांच्या उत्पत्तीशी संबंध असू शकतो. या प्रकारांची अद्याप पडताळणी केली गेली नसली तरी, त्यांचा असा विश्वास आहे की याचा संभाव्य स्त्रोत उंदीर असू शकतात जे वारंवार न्यूयॉर्क शहराच्या सीवर सिस्टममध्ये प्रवेश करतात.


हे निष्कर्ष जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. जॉन्सन म्हणाले की, "उदाहरणार्थ, आम्हाला अद्याप माहित नाही की ओमायक्रॉन प्रकार कुठून आला आहे, परंतु तो कुठूनतरी आले आहे. विषाणूंचे वेगवेगळे प्रकारांवर सर्वत्र संशोधन सुरु आहेत, ज्यात ओमायक्रॉनचाही समावेश आहे. ओमायक्रॉन अखेरीस कम्युनिटी स्प्रेडच्य टप्प्यात पोहोचला असून त्याचा कहर सुरु आहे. कोरोनाचे आणखी नवे व्हेरियंटही येऊ शकतात"


संशोधकांनी जून 2020 पासून न्यूयॉर्क शहरातील 14 ट्रीटमेंट प्लांटमधील सांडपाण्याचे नमुने घेतले. त्यांनी अमेरिकेतील इतर संशोधकांशीही संपर्क साधला जे सांडपाण्यावर अशाचप्रकारे काम करत होते. त्यांना काही असामान्य परिणाम आढळले. जॉन्सन यांनी सांगितले की, "विषाणूचे प्रकार भिन्न होते, परंतु त्यांच्या सर्वांमध्ये विषाणूवरील एका विशिष्ट स्थानावर समान Q498 Y मध्ये परिवर्तन झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, न्यूयॉर्क शहरातील बहुतेक नमुन्यांमध्ये, Q498 ला Q, Y, किंवा ग्लूटामाईनमध्ये टायरोसिनमध्ये बदल झाल्याचे आढळले. 


संशोधकांनी असे नमूद केले की संभाव्य स्पष्टीकरण ही एक अभिसरण उत्क्रांती नावाची जैविक प्रक्रिया असू शकते. न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटीच्या क्वीन्स कॉलेजमधील विषाणूशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक जॉन डेनेही म्हणाले, "मिसुरीमधील एक प्राणी न्यूयॉर्क शहरातील समान प्रकारच्या प्राण्यांमध्ये मिसळत नाही. म्हणून, प्रत्येक भौगोलिक प्रदेशातील विषाणूंची उत्क्रांती एकमेकांपासून स्वतंत्र आहे, परंतु ते एकच प्राणी असल्याने, विषाणू दोन्ही ठिकाणी सारखाच दिसतो." असे त्यांनी सांगितले.


टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी-सॅन अँटोनियो येथील सहयोगी प्राध्यापक, प्रमुख लेखक डेव्हिडा स्मिथ यांच्या मते, "वेस्ट वॉटर मॉनिटरिंग जलद, स्वस्त आणि निःपक्षपाती आहे. संसाधनांच्या उपलब्धतेवर आधारित विविध संदर्भांमध्ये विशेषत: कमी चाचणी आणि लस उपलब्धता यासारख्या मर्यादित संसाधनांच्या क्षेत्रात याची अंमलबजावणी करण्याची क्षमता आहे."


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha