WHO about Corona : जगभरात कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत असल्याची चिन्ह दिसत आहेत. नवा आलेला ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा धोकाही आता कमी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना संपला अशा चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. पण अशाप्रकारची कोणतीही घोषणा करु नका, कोरोना अजून संपलेला नाही, असे खडे बोल जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सुनावले आहेत.  


दरम्यान कोरोना महामारी येऊन दोनहून अधिक वर्ष झाली आहेत. पण ही महामारी कधी संपेल याबाबत कोणीही अद्याप काही सांगू शकत नाही. तसंच जेही कोरोना संपला असा दावा करत आहेत, त्यांनी अशी कोणतीही घोषणा कोणी करू नये, असं सौम्या यांनी सांगितलं आहे. ‘ब्लूमबर्ग क्विकटेक’च्या ‘एम्मा बार्नेट मिट्स’ या कार्यक्रमात स्वामिनाथन यांनी हे भाष्य केलं आहे. तसंच कोरोनाचे आणखीही व्हेरीयंट येऊ शकतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं याआधी सांगतिलं होतं. सौम्या यांनीदेखील हेच पुनरुच्चार केले.   


भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस तयार


वर्षभरापासून भारतामध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण एक महत्वाचं शस्त्र ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची गुरुवारी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशाली कोरोना स्थितीची माहिती देण्यात आली. त्यासोबतच एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए Messenger RNA (mRNA)  कोरोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस अंतिम टप्यात आहे. ही लस पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स (Gennova Biopharmaceutical ) यांनी विकसीत केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही लस वापरास येऊ शकते, असे निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले.   


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha