Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा पाचवा दिवस, संघर्ष सुरुच
Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
LIVE
Background
Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.
McDonald's : मॅकडोनाल्डवर बंदीची मागणी, पण नेमकं कारण काय?
Israel-Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षादरम्यान अमेरिकन फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्ड (McDonalds) वर बंदीची मागणी करण्यात येत आहे. मॅकडोनाल्ड्स (Mcd) च्या एका निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Operation Ajay : इस्रायलहून 274 भारतीयांची चौथी तुकडी दिल्लीत दाखल
Israel-Hamas Conflict : इस्रायलहून भारतीयांची चौथी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये 250 हून अधिक भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने ऑपरेशन अजय हाती घेतलं आहे.
#OperationAjay update!
— Arindam Bagchi (@MEAIndia) October 15, 2023
4th flight with 274 passengers onboard touches down in New Delhi.
Citizens welcomed by MoS @MORTHIndia @Gen_VKSingh at the airport. pic.twitter.com/o5r6FGGDDU
इस्रायलमध्ये 377 जखमी रुग्णालयात दाखल
इस्रायली आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हमासच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी 377 अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 99 गंभीर आहेत तर, इतरांची प्रकृती स्थिर आहे. हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून 3,715 जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अमेरिकन नागरिकांना समुद्रमार्गे बाहेर काढणार
इस्रायलमधील अमेरिकन दूतावासाने इजिप्तच्या हैफामधून अमेरिकन लोकांना समुद्रमार्गे तात्काळ बाहेर काढण्याची ऑफर दिली आहे. इस्रायलमधील यूएस दूतावासाने अमेरिकन आणि तात्काळ नातेवाईकांना 16 ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील हैफा ते सायप्रसला समुद्रमार्गे स्थलांतरित करण्याची ऑफर दिली.
Gaza Water Issue : गाझामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा तुटवडा
इस्रायलने पाणीपुरवठा बंद केल्यानंतर गाझातील लोकांना आता विहिरींचे दूषित पाणी प्यावे लागत आहे, त्यामुळे पाण्याशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे.