Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा आठवा दिवस, संघर्ष सुरुच

Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Oct 2023 11:31 AM
Israel-Hamas War : मृत्यूच्या दाढेतून परतली! गाझामधील सुटकेनंतर भारतात परतलेल्या महिलेनं सांगितलं युद्दाचं धक्कादायक वास्तव

Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यात घनघोर युद्द सुरु आहे. दिवसेंदिवस त्यांच्यातील तणाव आणखी वाढताना दिसत आहे. 7 ऑक्टोबरला सुरु झालेल्या युद्धात आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर एका भारतीय महिलेनेही आपल्या कुटुंबासह गाझा सोडून इजिप्तच्या सीमेवर आली, त्यानंतर आता ती इजिप्तला जाण्याच्या तयारीत आहे. गाझा सोडलेल्या भारतीय महिलेनं तेथील युद्धाचं धक्कादायक वास्तव सांगितलं.


वाचा सविस्तर बातमी

Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल, दोन चिमुकल्यांसह 235 जणांचा समावेश; 500 हून भारतीय सुखरुप मायदेशी

Israel-Hamas War : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने ऑपरेशन अजय हाती घेतलं आहे. ऑपरेशन अजय अंतर्गत भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांसह 235 जणांचा समावेश आहे. याआधी पहिल्या तुकडीत 212 भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 500 हून भारतीय सुखरुप परतले आहेत.

Israel-Hamas War Live Updates : दक्षिण कोरियाने आपल्या 163 नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढलं

दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, वाढत्या संघर्षादरम्यान सैन्याने ऑपरेशनच्या मदतीने 163 नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण कोरियाच्या लोकांना घेऊन जाणारे KC-330 लष्कराचे विमान शनिवारी पहाटे तेल अवीव येथून निघाले आणि आज सोल हवाई तळावर उतरणे अपेक्षित आहे. 51 जपानी आणि सहा सिंगापूरचे नागरिकही या फ्लाइटमध्ये सामील आहेत.

Israel-Hamas War Live Updates : दशहवाद्यांचा खात्मा करण्यासाठी इस्रायल लष्कराकडून मोहीम हाती

गाझा पट्टीमध्ये इस्रायचे (Israel) लष्करी सैन्य घुसले असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. बेपत्ता इस्रायलच्या लोकांना शोधण्यासाठी इस्रायली सैनिक गाझा पट्टीमध्ये दाखल झाले आहेत. सध्या इस्रायली सौनिकांकडून हमासने ओलिस ठेवलेल्या नागरिकांचा शोध आणि बचावकार्य राबवण्यात येत आहे. 

पार्श्वभूमी

Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.