Aishwarya Rai Bachchan Video: ऐश्वर्या राय बच्चन... (Aishwarya Rai Bachchan) विश्वसुंदरी आणि बॉलिवूडचा (Bollywood Actress) नामांकीत चेहरा... पण तुम्हाला माहीत आहे का? या सौंदर्यवतीलाही तिच्या करिअरमध्ये अगदी वाईट काळ पाहावा लागला होता.


ऐश्वर्याच्या करिअरला उतरती कळा लागण्यासाठी कारणीभूत होता बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan). हो... तुम्ही बरोबर ऐकताय, शाहरुख खानमुळेच ऐश्वर्याच्या करिअरला उतरती कळा लागली होती. हे आम्ही नाही, स्वतः ऐश्वर्या आणि शाहरुखनं इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सांगितलं आहे. 


बॉलिवूडचा एक काळ असा होता की, जिथे फक्त ऐश्वर्याचीच चलती होती. केवळ भारतीयच नाहीतर जगभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत असताना ऐश्वर्याला अपयशाचा सामना करावा लागला. पण, यामध्ये तिची चूक नव्हती, तर यासाठी कारणीभूत होता खुद्द किंग खान. शाहरुखनं ऐश्वर्याला तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं होतं. Rendezvous विद सिमी गरेवाल या शोमधल्या जुन्या मुलाखतीत  ऐश्वर्यानं आपल्या अॅक्टिंग करिअरमधल्या सर्वात कठीण काळाचा उल्लेख केला आणि कित्येक वर्षापासून मनात साठवून ठेवलेल्या कटू आठवणींना मोकळी वाट करुन दिली. ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला की, तिला वीर ज़ारा आणि इतर काही चांगल्या फिल्म्समधून अचानक हटवलं का गेलं? 


प्रश्न ऐकून ऐश्वर्या अस्वस्थ झाली. त्यानंतर तिनं माझ्याकडे या प्रश्नाचं अजिबात उत्तर नसल्याचं सांगितलं. ऐश्वर्या म्हणाली की, अनेक चित्रपट करण्याबाबत तिच्या अनेकांशी चर्चा झाल्या. पण, त्यानंतर मला कसलीही कल्पना न देता, अचानक त्या फिल्म्समधून हटवलं गेलं. त्यानंतर तिनं यासंदर्भात सविस्तर खुलासा केला. 


काय म्हणालेली ऐश्वर्या...? VIDEO






शोमध्ये बोलणं सुरू असतानाच ऐश्वर्याला सांगितलं गेलं की, शाहरुख खाननं एका मुलाखतीत बोलताना याचसंदर्भात दुःख व्यक्त केलं. सिमीनं सांगितलं की, शाहरुखनं ऐश्वर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावल्याबाबत खेद व्यक्त केला आणि स्वतःची चूक मान्य केली. यावर शाहरुख म्हणाला की, मला माझ्या मर्यादा ओलांडायला नको होत्या. 2003 मध्ये SRK नं कबुल केलं की, ऐश्वर्याला रिप्लेस करणं अत्यंत कठीण होतं आणि खरंच खूप दुःखद निर्णय होता. त्यानंतर शाहरुखनं तिची माफी मागितल्याचंही सांगितलं. 


ऐश्वर्यानं सांगितलं की, माझ्याकडे याचं उत्तर नाही आणि तिनं म्हटलं की, मला ज्या फिल्म्समधून हटवलं गेलं, ती तिची चॉईस नव्हती. दरम्यान, शाहरुख आणि ऐश्वर्या यांच्यात चांगली मैत्री होती आणि त्यांनी देवदास, जोश,  मोहब्बतें, ऐ दिल है मुश्किल आणि इतर काही चित्रपटांमध्ये स्क्रिन शेअर केली आहे.