Israel Hamas War : इस्रायलचे सैन्य गाझा पट्टीत घुसले, दशहवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम हाती : इस्रायली लष्कर
Israel Palestine War: इस्रायलचे लष्करी सैन्य हमासच्या गाझा पट्टीमध्ये घुसले असल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराकडून देण्यात आली आहे.
Israel Hamas War: गाझा पट्टीमध्ये इस्रायचे (Israel) लष्करी सैन्य घुसले असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. तर गाझा पट्टीमध्ये पहिल्यांदाच इस्रायली सैन्य घुसले आहे. दरम्यान इस्रायलच्या सैनिकांनी हमासच्या सेलसह अनेक दहशतवाद्यंना ठार केले. हमासने (Hamas) इस्रायलवर देखील क्षेपाणास्त्रे डागले होते, असं इस्रायलच्या लष्कराने सांगितले. दरम्यान बेपत्ता इस्रायलच्या लोकांना शोधण्यासाठी इस्रायली सैनिक गाझा पट्टीमध्ये दाखल झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान बेपत्ता असलेल्यांचा शोध सध्या सौनिकांकडून घेण्यात येत आहे.
दहशतवाद्यांची शस्त्रे नष्ट
गाझा पट्टीमध्ये घुसून दहशतवाद्यांची शस्त्रे नष्ट केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर गाझा पट्टीत दाखल झाले असून ते बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहे. 'दहशतवाद्यांशी लढण्यासाठी, शस्त्रे नष्ट करण्यासाठी आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध सैनिकांकडून घेण्यात येत आहे. '
इस्रायालच्या हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, हमासने एका निवदेनात म्हटलं होतं की, गाझा येथून निघालेल्या ताफ्यांवर इस्रायलने हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे.
सुमारे आठवडाभरापूर्वी म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी सकाळी हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून इस्रायल आणि पॅलस्टाईनमध्ये युद्धाची ठिणगी पेटली. तर इस्रायलच्या हवाईदलाकडून गाझावर सातत्याने बॉम्बहल्ले करण्यात येत आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आठ दिवस झाले आहेत. गुरुवारी (12 ऑक्टोबर) इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयानं एक फोटो जारी केला, ज्यामध्ये हत्या करण्यात आलेल्या नवजात बाळांच्या आणि लहान मुलांच्या मृत्यूमागे हमासचा हात असल्याचा दावा करण्यात आला. नेत्यानाहू यांनी काही फोटो ट्वीट केले आहेत. फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी दावा केलाय की, हमासच्या सैनिकांनीच त्या नवजात बाळांचा जीव घेतला आहे.
इस्रायलमधील भारतीयांसाठी 'ऑपरेशन अजय'
ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेले 212 भारतीय मायदेशात परतले आहेत. एअर इंडियाचं विमान सकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी भारतात उतरलं. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकार ऑपरेशन अजय मोहीम राबवत आहे. दरम्यान सुमारे 18 हजार भारतीय नागरिक कामासाठी आणि अभ्यासासाठी इस्रायलमध्ये राहत आहेत.
हेही वाचा :
Israel Palestine : पॅलेस्टाईन नाही तर इस्त्रायलने तयार केली होती हमास संघटना