एक्स्प्लोर
Advertisement
विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेविरोधातील याचिका इस्लामाबाद हायकोर्टानं फेटाळली
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निर्णयाविरोधातील अॅड. शोएब रझाक यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. इम्रान खान यांचा हा निर्णय देशाचं परराष्ट्र धोरण आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने योग्यच असल्याचा पाकिस्तानी कोर्टानं आपल्या निकालात निर्वाळा दिला आहे.
इस्लामाबाद : भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय योग्यच असल्याचा निर्णय इस्लामाबाद उच्च न्यायालयानं दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निर्णयाविरोधातील अॅड. शोएब रझाक यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. इम्रान खान यांचा हा निर्णय देशाचं परराष्ट्र धोरण आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्यच असल्याचा पाकिस्तानी कोर्टानं आपल्या निकालात निर्वाळा दिला आहे.
VIDEO | भारताचा ढाण्या वाघ अभिनंदन यांचं मायभूमीत आगमन | वाघा बॉर्डर | एबीपी माझा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात परत पाठवण्याच्या घोषणा पाकिस्तानी संसदेच्या विशेष सदनात केली होती. इम्रान खान यांच्या या घोषणेविरोधात अॅड. मोहम्मद शोएब रझाक यांनी तातडीनं इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती अथर मिनाल्लाह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली.
पंतप्रधान इम्रान खान यांनी हा निर्णय संसदेला विश्वासात न घेता केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. मात्र जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा एकाही सदस्यानं त्याला विरोध केला नाही. यावर ती घोषणा संसदेच्या विरोधात कशी? असा सवाल इस्लामाबाद हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना विचारला. त्याचबरोबर विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका याचिकाकर्त्यांच्या मुलभूत अधिकारांच्या कशी आड येते? याचं उत्तर देण्यातही याचिकाकर्ते अपयशी ठरले. त्यामुळे पाकिस्तानी संसदेत झालेला निर्णय हा परराष्ट्र धोरण आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्यच असल्याचा निर्वाळा देत पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयानं भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेविरोधातील ही याचिका फेटाळून लावली.
विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात 'या' खडतर परीक्षांचा सामना करावा लागणार
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमन शुक्रवारी रात्री 60 तासांच्या नंतर भारतात परतले. अटारी वाघा बॉर्डरवरुन त्यांना वायुसेनेने हेलिकॉप्टरने दिल्लीत आणले आहे. आज अभिनंदन यांना वायुसेनेच्या नियमांनुसार 'डीब्रिफिंग' आणि 'बग स्कॅनिंग' चा सामना करावा लागणार आहे. यामध्ये सेना आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहे. यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप होईल.
भारतीय वायुसेनेच्या नियमानुसार कमांडर अभिनंदन यांना काही कठीण परीक्षांमधून जावे लागणार आहे. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनंदन यांना भारतात वापसीनंतर काही परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. हे खरतर चांगलं वाटत नाही मात्र, भारतीय वायुसेनेचे नियम आणि कायदे कडक आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या देशात पकडल्यानंतर आपल्या देशात आल्यावर या टेस्टचा सामना करावाच लागतो. याला अन्य कुठलाही पर्याय नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज, शनिवारी त्यांच्याशी डीब्रिफिंग होईल. यावेळी वायुसेनेचे अधिकारी त्यांच्याशी पाकिस्तानात घालवलेल्या वेळेबद्दल विचारपूस करतील. वायुसेनेच्या इंटेलिजन्सची ही डीब्रीफिंग खूप त्रासदायक असते. वायुसेनेच्या नियमांनुसार हे अनिवार्य असते. यामध्ये दुष्मनांनी पकडलेल्या जवानांकडून कैदेत असताना काही माहिती दिली आहे का? दुष्मनांच्या सेनेने त्यांना त्यांच्या सैन्यात सामावून तर घेतले नाही ना? या गोष्टींवर बारकाईने विचारपूस केली जाते.
यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना काही मेडिकल टेस्टचा सामना करावा लागेल, ज्यामध्ये पूर्ण बॉडी चेकअप देखील होईल.
यानंतर अभिनंदन यांची स्कॅनिंग होईल. ज्यामध्ये पाकिस्तानी आर्मीने काही 'बग' फिट केला आहे का? याबद्दल तपासलं जाईल.
यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सायकॉलॉजिकल टेस्ट देखील होईल. यामध्ये त्यांची मानसिक स्थिती कशी आहे? याची माहिती काढली जाईल.
यानंतर विंग कमांडर यांच्याशी इंटेलिजेंस ब्यूरो (IB)आणि रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) सुद्धा चौकशी करेल.
भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमन भारतात परतले आहेत. तब्बल 60 तासांच्या प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी डेरेदाखल झाले. अभिनंदन यांच्या पुनरागमनानंतर वाघा बॉर्डरवर एकच जल्लोष झाला. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर तीन दिवसांच्या आत अभिनंदन यांचं भारतात प्रत्यावर्तन करण्यात आलं. त्यांना पाकिस्तानकडून भारताकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेला काहीशी दिरंगाई झाली. तरीही, भारताच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान प्रत्यावर्तन मानलं जात आहे. मायदेशी परतल्याचा मोठा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांनी दिल्याची माहिती अमृतसरमधील अधिकाऱ्यांनी दिली. वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परत आले. भारतात परतण्यापूर्वी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement