एक्स्प्लोर

Iran Anti-Hijab Protests : इराणच्या फुटबॉलपटूला मृत्यूदंडाची शिक्षा, हिजाबविरोधी प्रदर्शनाला पाठिंबा देणं महागात

Iran Anti-Hijab Protests : हिजाबविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे इराणचा फुटबॉलपटू अमीर नस्र-अजादानी (Amir Nasr-Azadani) याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Iran Hijab Protest : इराणमध्ये (Iran) गेल्या काही महिन्यांपासून देशव्यापी हिजाबविरोधी चळवळ (Iran Anti-Hijab Protests) सुरु आहे. या हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा देणं एका फुटबॉलपटूला (Footballer) महगात पडलं आहे. हिजाबविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे इराणचा फूटबॉलपटू (Iranian Footballer) अमीर नस्र-अजादानी (Amir Nasr-Azadani) याला मृत्यूदंडाची शिक्षा (Death Sentence) सुनावण्यात आली आहे. अमीर नस्र-अजादानी 26 वर्षांचा असून एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार, अमीर नस्र-अजादानी याला नोव्हेंबस महिन्यात हिजाबविरोधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमीरवर इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स कमांडरच्या मृत्यूचा आरोपही लावण्यात आला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, अमीर नस्र-अजादानी एका हिजाबविरोधी आंदोलनात काही वेळासाठी सहभागी झाला होता. यावेळी त्याने इतर आंदोलकांसोबत मिळून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यानंतर अमीर नस्र-अजादानीला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर 'मोहरे बेह' म्हणजे देवाविरुद्ध शत्रुत्वाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 'मोहरे बेह' गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात येते.

फिफ्प्रोने केला निषेध 

फिफ्प्रो (FIFPRO) या व्यावसायिक फुटबॉल खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने अमीर नसर-अजदानीला दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आवाज उठवला आहे. व्यावसायिक फुटबॉल खेळाडू अमीर नसर-अजादानी याला इराणमध्ये आपल्या देशात महिलांच्या हक्कांसाठी आणि मूलभूत स्वातंत्र्यांसाठी मोहीम चालवल्याबद्दल फाशीची शिक्षा भोगावी लागत असल्याच्या बातमीने फिफ्प्रोला खूप धक्का बसला आहे. संघटनेने ट्विट करत म्हटले आहे की, 'आम्ही आमिरच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत आणि त्याची शिक्षा त्वरित रद्द करण्याची मागणी करतो.'

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरु झाली हिजाबविरोधी चळवळ

सप्टेंबर महिन्यात 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने इराणमध्ये हिजाब विरोधी मोहिम इराणमध्ये निदर्शने सुरू झाली. महसा अमिनीला राजधानी तेहरानच्या भेटीदरम्यान हिजाब व्यवस्थित न घातल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.  त्यानंतर पोलीस कोठडीत असताना तिला दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर, हिजाबविरोधी निदर्शने इराणमध्ये वणव्यासारखी पसरली आणि चळवळ अधिक तीव्र झाली. इराणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिजाबविरोधी संघर्ष सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांना इराण सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 May 2024: ABP MajhaSangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Sharma: एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ 
भावा ऑडिओ बंद कर, एका ऑडिओनं वाट लावली, रोहित शर्मा अलर्ट, काय घडलं?
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
4 जूननंतर शेतकऱ्यांसाठी काय करणार? रायबरेलीतल्या सभेत राहुल गांधींनी दिलं आश्वासन 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Embed widget