International Girl Child Day 2022 : मुलींच्या हक्क आणि संरक्षणाची जाणीव करून देणारा दिवस 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन'; वाचा इतिहास आणि महत्त्व
International Girl Child Day 2022 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करणे.
International Girl Child Day 2022 : आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांसमोरील आव्हाने आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण याबद्दल जागरूकता निर्माण करणे. समाजातील लिंग-भेद, स्त्रीभ्रृण हत्या, बालविवाह, हिंसाचार यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
पूर्वीच्या काळी बालविवाह प्रथा, सती प्रथा, हुंडा प्रथा, स्त्री भ्रूणहत्या यांसारख्या सनातनी प्रथा प्रचलित होत्या. या कारणास्तव मुलींना शिक्षण, पोषण, कायदेशीर हक्क यांसारख्या गोष्टी नाकारल्या गेल्या. मात्र, आता या आधुनिक युगात मुलींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व (International Girl Child Day Importance 2022) :
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत सरकारही या दिशेने जोमाने काम करत आहे. अनेक योजनाही त्या दृष्टीने राबविल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2012 मध्ये सुरू झाला. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यास मदत करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय, त्यांच्यासमोरील आव्हाने पूर्ण करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच मुलींवरील लैंगिक असमानता संपवण्यासाठी जनजागृती करण्यासाठीही त्याची मदत घेतली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास (International Girl Child Day History 2022) :
बालिका दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा उपक्रम 'प्लॅन इंटरनॅशनल' या स्वयंसेवी संस्थेचा प्रकल्प म्हणून करण्यात आला. या संस्थेने 'क्यूंकी मैं एक लडकी हूॅं' नावाची मोहीमही सुरू केली होती. यानंतर या मोहिमेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी कॅनडा सरकारशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर कॅनडा सरकारने 55 व्या महासभेत हा ठराव मांडला. शेवटी, संयुक्त राष्ट्र संघाने 19 डिसेंबर 2011 रोजी हा ठराव पास केला आणि त्यासाठी 11 ऑक्टोबर हा दिवस निवडण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :