International Day Of Peace 2022 : आज आहे 'आंतरराष्ट्रीय शांती दिवस'; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
International Day Of Peace 2022 : आपल्या जीवनात शांतीचे महत्व मोठं आहे. ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी बंधुभाव, मधुरता, समाधान आणि आनंद असतो.
International Day Of Peace 2022 : आपल्या जीवनात शांतीचं महत्व फार मोठं आहे. ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी बंधुभाव, मधुरता, समाधान आणि आनंद असतो. शांतीविना जगण्याला कोणताच अर्थ नाही. याच शांततेचं महत्व सांगण्यासाठी जगभरात दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय शांती दिवस' (International Day Of Peace) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्षाची परिस्थिती संपवून शांतीला प्रोत्साहन देणं हा आहे.
हा दिवस 1982 पासून 'Right to peace of people' या थीमसह सुरू करण्यात आला. 1982 ते 2001 पर्यंत, सप्टेंबरचा तिसरा मंगळवार हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस किंवा जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जात होता. परंतु, 2002 पासून, 21 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिन साजरा केला जातो. जगभरात शांततेचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने कला, साहित्य, संगीत, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे.
जागतिक शांतता दिनी पांढरे कबूतर उडवून शांततेचा संदेश दिला जातो आणि एकमेकांनी शांतता राखावी अशीही अपेक्षा असते. पांढरे कबूतर शांतीचे प्रतिक मानले जाते. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघाकडून विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये शांतता दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जातात. जीवनाचे मुख्य ध्येय शांती आणि आनंद प्राप्त करणे आहे, ज्यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो. परंतु, शांतीसाठी प्रयत्न करत नाही. संपूर्ण जग सर्व देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
या अंतर्गत दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने जागतिक पातळीवर शांतता राखण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची थीम :
संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी नवीन थीमद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्याचे आवाहन करते. या वर्षीही 'समान आणि शाश्वत विकासासाठी उत्तम पुनर्प्राप्ती' ही नवीन थीम ठेवण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये दया, आशा, मानवता आणि करुणा जागृत करून आंतरराष्ट्रीय दिन साजरा करावा, तरच या दिवसाचे महत्त्व सिद्ध होईल, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. त्याचबरोबर देशांमधील वाढती स्पर्धा, द्वेष आणि भेदभाव नष्ट करून संयुक्त राष्ट्रांच्या पाठीशी उभे राहा. असंही आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :