Sri Lanka Vegetable Price Hike: श्रीलंकेतील (Sri Lanka) लोकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. श्रीलंकेत सध्या भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या महिन्याभरात वस्तूंच्या किंमतींमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे.


भाज्यांच्या किंमती वाढल्या 


श्रीलंकेत भाज्यांच्या देखील किंमती वाढल्या असून 100 ग्रॅम मिर्ची ही 71 रूपयांना मिळत आहे. म्हणजेच एक किलो मिर्ची घ्यायची असेल तर श्रीलंकेतील लोकांना 700 रूपये द्यावे लागतील. महिन्याभरात  250 टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ मिर्चीच्या किंमतीमध्ये झाली आहे. 


भाज्यांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने श्रीलंकेतील सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे.  जवळपास 2.2 कोटी लोकसंख्या असणारा श्रीलंका हा देश सध्या  आर्थिक संकटाचा समना करत आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा हा नोव्हेंबरच्या अखेरीस सुमारे $1.6 अब्जपर्यंत घसरला. श्रीलंकेच्या सरकारला  जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालावे लागले. त्यामुळे श्रीलंकेत अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा वाढला आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खूप महाग झाल्या.


गेल्या चार महिन्यात श्रीलंकेमध्ये सिलेंडरच्या किंमतीमध्ये  सुमारे 85% वाढ झाल्याचा अंदाज आहे. तसेच श्रीलंकेत दूधाच्या किंमतींमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका देश मोठ्या प्रमाणात अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून आहे, परंतु सध्या श्रीलंकेला परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ज्याचा थेट परिणाम त्याच्या अन्न, धान्यांच्या किंमतींवर होतो.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha