Upcoming Movies and Web Series On Amazon Prime Video : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एकीकडे सिनेमागृहांना टाळे लागले असतानाच, दुसरीकडे त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मला पोहोचले. आलम म्हणजे ज्या प्रकारे लोक चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत असत, त्याचप्रमाणे आता मालिका आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतात. गेल्या दोन वर्षांत, लोकांना ओटीटीवर कंटेंट पाहण्याचे इतके व्यसन लागले आहे की लोकांचे थिएटर्सबद्दलचे आकर्षण आता कमी होत आहे.


सिनेमागृहे आता कुठे चालू झाले होते, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांनी पुन्हा सर्व काही ठप्प केले. अशात आता तुमच्या मनोरंजनासाठी Amazon Prime Video वर, अशा अनेक मालिकांचे आगामी सीझन आणि चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पाहूया चित्रपट आणि मालिकांची यादी


फोर मोर शॉट्स सीझन 3 (FOUR MORE SHOTS SEASON 3) : 'फोर मोअर शॉट्स' ही Amazon प्राईम व्हिडिओची सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज आहे. मालिकेच्या बोल्डनेसबाबत काही वाद झाले असले तरी त्याचे दोन्ही सीझन खूप हिट ठरले आहेत. त्याचवेळी 'फोर मोअर शॉट्स'चा तिसरा सीझन यावर्षी रिलीज होऊ शकतो.


पंचायत सीझन 2 (PANCHAYAT SEASON 2) : अभिषेक त्रिपाठी आणि नीना गुप्ता यांच्या 'पंचायत' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले आहे. मालिकेचा पहिला सीझन संपल्यापासूनच लोक सीझन 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.


मिर्झापूर सीझन 3 (MIRZAPUR SEASON 3) : आतापर्यंत मिर्झापूरचे दोन सीझन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाले आहेत आणि दोन्ही सीझनने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. आता लोक त्याच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत जो या वर्षी रिलीज होऊ शकतो.


द बॉईज सीझन 3 (THE BOYS SEASON 3) : अॅमेझॉन प्राईम व्हिडिओची लोकप्रिय सीरिज 'द बॉय' अनेक सुपरहिरोवर आधारित आहे. या मालिकेचा तिसरा भाग यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय, 'मेड इन हेवन सीझन 2' 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज सीझन 1', 'द टेंडर बार', 'रीचर' या काही मालिका आणि चित्रपट आहेत जे यावर्षी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होऊ शकतात.


गेहरिया (GEHRAIYAAN) :  अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांचा आगामी चित्रपट 'गेहरिया' 11 फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु अलीकडेच त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha