Pfizer Covid19 Vaccine : फायझरचे (Pfizer) मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, फायझर आधीच कोविड लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. जगभरातील सरकार त्यांच्या देशात कोरोनाच्या संसर्गाशी लढा देत आहेत. ज्यामध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे वाढत्या रुग्णांचाही समावेश आहे.

Continues below advertisement

बोएर्ला यांनी सांगितले की, मार्चपर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) वर लस तयार होईल. या लसीची गरज पडेल की नाही, तिचा वापर होईल की नाही हे माहीत नाही, पण तरीही आपण ही लस तयार करत आहोत, असेही ते म्हणाले. बोएर्ला म्हणाले की, सध्याच्या कोविड-19 विरूद्ध संरक्षण करण्यासाठी दोन लसींचे डोस आणि बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनच्या आरोग्यावरील गंभीर परिणामांपासून संरक्षण मिळाले आहे. परंतु ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता प्रकार थेट लक्षात घेता, ही कोविडविरोधी लस अशा प्रकारांपासून संरक्षण करेल जे अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्यामुळे अनेक सौम्य किंवा क्वचित संक्रमण झाले आहे.

मॉडर्ना (Moderna) देखील ओमायक्रॉनवर कोविड लस विकसित करत आहेदरम्यान, मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टीफन बॅन्सल यांनी त्याच वृत्तसंस्थेशी दुसर्‍या मुलाखतीत बोलताना सांगितले की, मॉडर्ना कंपनीही एक बूस्टर डोस विकसित करत आहे, जे ओमायक्रॉन आणि कोविडच्या इतर संभाव्य प्रकारांना रोखण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. 2022 वर्षाच्या शेवटपर्यंत ही लस तयार होईल. बन्सेल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, 2022 च्या अखेरीस कोविडच्या संभाव्य प्रकारांना सामोरे जाण्यासाठी आणि त्याच्या संभाव्य बूस्टरसाठी सर्वोत्कृष्ट अशी कोणती लस तयार करायची हे ठरवण्यासाठी आम्ही जगभरातील नेत्यांशी चर्चा करत आहोत. धोरण काय आहे.

Continues below advertisement

ओमायक्रॉन जगभरातील कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरत आहे. परंतु या विषाणूमुळे मृत्यू होण्याचा धोका किंवा शरीराच्या अवयवांना इजा होण्याची भीती खूपच कमी असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, हा विषाणू लहान मुलांना झपाट्याने संक्रमित होत असल्याचेही आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha