Omicron : युरोपिय युनियनने (EU) सोमवारी महत्वपूर्ण घोषणा करुन दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानावरची बंदी उठवली आहे. 'ओमायक्रॉन' या कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका लक्षात एक महिन्यापूर्वी घेता दक्षिण आफ्रिकेतून युरोपमध्ये येणाऱ्या सर्व विमान वाहतुकीवर युरोपियन युनियनने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेतूनच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटची सुरुवात झाली होती. यानंतर 27 देशांच्या या संघटनेने आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती. ओमायक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढदेखील झाली. 


दक्षिण आफ्रिकेतून विमान प्रवास बंदी उठवली :
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) युरोपिय युनियनसह (European Union)जगभरात अनेक देशांत कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झालेली आहे. आता युरोपिय युनियनचे अध्यक्ष फ्रांस यांनी सोमवारी केलेल्या घोषणेनुसार, दक्षिण आफ्रिकेतून विमानाने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने 2021 च्या शेवटच्या दिवसांत कोविडचे नियम शिथिल केले होते. गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये लावण्यात आलेला कर्फ्यू 30 डिसेंबरला हटविण्यातही आला होता. सध्या येथे बूस्टर डोस आणि लसीकरण अभियान सुरु आहे. 


कॉरंटाईन आणि चाचणीच्या नियमांमध्ये शिथिलता :
दक्षिण आफ्रिकेत, सुरुवातीला कॉरंटाईनचे नियम आणि संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात येण्याची चाचणीदेखील शिथिल करण्यात आली होती. परंतु नंतर ते मागे घेण्यात आले. सिरो सर्वेक्षणानुसार (Sero Survey)50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 79 ते 93 टक्के लोकांमध्ये ऍन्टीबॉडीज आढळून आल्या होत्या. कोविड-19 मुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या संख्येतही याच वर्गाचे प्रमाण सर्वात जास्त होते. सिरो सर्वेक्षणाच्या आकड्यांनुसार देशात मोठ्या संख्येने लोकांमध्ये लसीकरणापूर्वीच प्रतिकारशक्ती विकसित झाली होती.


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


[yt][/yt]