एक्स्प्लोर
हॉटेलचं बिल 6 हजार, 82 हजार रुपयांची टीप!
![हॉटेलचं बिल 6 हजार, 82 हजार रुपयांची टीप! Industrialist Paid 1000 Pound Tip In Indian Restaurant For 79 Pound Bill हॉटेलचं बिल 6 हजार, 82 हजार रुपयांची टीप!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/16075725/London-Hotel-tip.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लंडन : हॉटेलात बिल दिल्यानंतर उरलेल्या सुट्ट्या पैशांची रक्कम साधारणतः वेटरला टीप म्हणून दिली जाते. ही टीप फार-फार तर शंभर-दोनशे रुपयांपर्यंत असू शकते, मात्र लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या भारतीय नागरिकाने तब्बल 82 हजार रुपये टीप दिली आहे.
उत्तर आयर्लंडमध्ये राहणाऱ्या एका धनाढ्य भारतीय उद्योगपतीने लंडनच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये ही टीप दिली. विशेष म्हणजे त्यांचं हॉटेल बिल झालं 79 पाऊण्ड म्हणजे सुमारे 6 हजार 472 रुपये. तर त्यांनी एक हजार पाऊंड म्हणजेच सुमारे 81 हजार 934 रुपये टीप म्हणून ठेवले.
पोर्टाडाऊनमध्ये असलेल्या ‘दि इंडियन ट्री’ या रेस्टॉरंटमधील कर्मचारी ही भरभक्कम टीप पाहून आश्चर्यचकित झाले. भारतात हॉटेलमध्ये ग्राहकांनी सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता, मात्र या दानशूर ग्राहकाकडे पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली.
संबंधित ग्राहकाला त्याचं नाव उघड करण्याची इच्छा नाही. 2002 पासूनच ते या रेस्टॉरंटच्या कूकने केलेल्या जेवणावर फिदा होते. जेवण, आदरातिथ्य आणि तिथलं वातावरण त्यांना खूप आवडतं, असं हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने सांगितलं.
त्यादिवशी जेवणानंतर त्यांनी बाबू नावाच्या कूकला जवळ बोलावलं. एक लहानशी गोष्ट देऊन तुझे आभार मानायचे आहेत, असं सांगत त्याला एक हजार पाऊंडची टीप दिली. त्यानंतर आम्ही सगळेच आश्चर्याच्या धक्क्यातून सावरलो नव्हतो, असं हॉटेलमधील कर्मचाऱ्याने म्हटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)