एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट
ज्यूरिख (स्वित्झर्लंड) : स्विस बँकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या ठेवींमध्ये कमालीची घट दिसून आली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2016 मध्ये स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या केवळ 4 हजार 500 कोटी रुपयांच्याच ठेवी उरल्या आहेत. आधीच्या तुलनेत ही रक्कम निम्म्याने घटली आहे.
काळ्या पैशाविरोधात मोदी सरकारकडून उचलण्यात येत असलेली कठोर पावले, तसेच स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेला पैसा घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे स्विस बँकेमधील भारतीयांच्या ठेवी घटल्या असल्या तरी इतर देशांकडून ठेवण्यात येणाऱ्या रकमेचा आकडा वाढून 96 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
1987नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्विस बँकेच्या ठेवीमध्ये घट झालेली पाहायला मिळाली आहे. 2006 साली भारतायींचे सर्वात जास्त पैसे स्विस बँकेत होते. त्यावेळी भारतीयांनी स्विस बँकेत 23000 हजार कोटीची रक्कम जमा केली होती. 2016 मध्ये स्विस बँकेतून भारतीयांनी सर्वाधिक 45 टक्के पैसे काढून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेचं हे यश मानलं जात आहे. संबंधित बातम्या:Indians' money in Swiss banks nearly halve to CHF 676 mn or about Rs 4,500 crore: Switzerland's central bank data.
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement