एक्स्प्लोर
Advertisement
डोंबिवलीकर कुटुंबाच्या इंग्लंडमधील घराबाहेर जाळपोळ
मयुर कार्लेकर ठाण्यातील डोंबिवलीमध्ये राहत होते. 19 वर्षांपूर्वी ते इंग्लंडला स्थायिक झाले.
मुंबई : डोंबिवलीतून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या मयुर कार्लेकर यांच्या घराबाहेर जाळपोळ करण्यात आली. चौघा स्थानिकांनी द्वेषापोटी हा हल्ला केल्याचा आरोप मयुर यांनी केला आहे. कार्लेकरांच्या घराबाहेरील झुडपं आणि गाडी शनिवारी जाळण्यात आली होती.
मयुर कार्लेकर ठाण्यातील डोंबिवलीमध्ये राहत होते. 19 वर्षांपूर्वी ते इंग्लंडला स्थायिक झाले. मयुर हे मॅक कार्लेकर या नावाने ओळखले जातात. पत्नी रितू आणि मुलगा-मुलीसह ते सध्या इंग्लंडच्या केंटमधील ऑरपिंग्टन भागात राहतात. मात्र शनिवारच्या घटनेनंतर ते आपलं राहतं घर सोडण्याच्या विचारात आहेत.
कार्लेकरांच्या घराबाहेरील झुडपं आणि गाडी शनिवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास चौघा जणांनी जाळली. कार्लेकर कुटुंब त्यावेळी गाढ झोपेत होतं. मात्र शेजाऱ्यांनी वेळीच जागं केल्यामुळे सर्व कुटुंबीय सुरक्षितरित्या घराबाहेर आले.
अग्निशमन दलाच्या गाड्या 25 मिनिटांनी आल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. पोलिसात तक्रार केल्यानंतरही दखल घ्यायला 32 तास आणि 7 फोन कॉल्स करावे लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. कोणालाही इजा न झाल्यामुळे आपली तक्रार प्राधान्याने न घेतल्याचं कार्लेकर म्हणतात. पोलिसांनीच आपल्याला सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितल्याचंही कार्लेकरांनी सांगितलं.
आपण इथे असुरक्षित असून पुन्हा एकदा हल्ला झाल्यास या परिसरातून बाहेर पडू, असं सांगताना कार्लेकरांच्या मनात भीती आहे. कार्लेकरांनी संपूर्ण घटनेची माहिती फेसबुकवरुन दिली आहे. तसंच घटनेचे फोटो आणि व्हिडिओही पोस्ट केले आहेत.
मॅक कार्लेकर हे इंग्लंडमध्ये डिजीटल कन्सल्टंट म्हणून काम करतात. 19 वर्षांपूर्वी टेक महिंद्रासोबत काम करण्यासाठी वर्क व्हिसावर ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांची रितू यांच्याशी ओळख झाली. कार्लेकरांनी आतापर्यंत एचसीएल, डेलॉईट आणि टीसीएससारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement