एक्स्प्लोर

Plane Crash : झिम्बाब्वेमध्ये हवेतच विमानाचा स्फोट; भीषण अपघातात भारतीय अब्जाधीश उद्योगपतीचा मुलासह मृत्यू

Zimbabwe Plane Crash : झिम्बाब्वे मध्ये झालेल्या विमान अपघातात भारतीय उद्योजकाचा आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

हरारे, झिम्बाब्वे :  झिम्बाब्वेमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात (Zimbabwe Plane Crash) भारतीय उद्योजक, त्यांचा मुलगा ठार झाला आहे. या अपघातात एकूण सहाजणांना प्राण गमवावे लागले आहे. नैर्ऋत्य झिम्बाब्वेमधील एका हिऱ्याच्या खाणीजवळ हे खासगी विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात भारतीय उद्योजक हरपाल रंधावा (Harpal Randhawa), त्यांचा मुलगा आमेर कबीर सिंह रंधावा आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

वृत्तसंकेतस्थळ 'आयहरारे'ने दिलेल्या वृत्तानुसार, मशावा येथील जवामहांडे भागात झालेल्या विमान अपघातात खाण कंपनी 'रियोजिम'चे मालक हरपाल रंधावा, त्यांचा मुलगा आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला आहे. रियोजिम कंपनी ही सोने आणि कोळशा खाणीचे उत्खनन करते. त्याशिवाय निकेल आणि तांबे शुद्धीकरण करणारी प्रमुख खाण कंपनी आहे. 

वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, रियोजिमच्या मालकीच्या सेसना 206 हे विमान शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी हरारे ते मुरोवा हिरा खाणीच्या दिशेने जात होते. या खाणीची मालकी रियोजिम कंपनीकडे आहे.  त्यावेळी हा अपघात घडला. सिंगल इंजिन असलेले विमान मुरोवा डायमंड खाणीजवळ अपघातग्रस्त झाले. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हवेतच स्फोट झाला.  या अपघातात विमानाचे पायलट क्रू आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. 

'द हेराल्ड' वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, , अपघातात ठार झालेले चार जण परदेशी नागरीक होते, तर इतर दोघे झिम्बाब्वेचे नागरिक होते. पोलिसांनी अद्याप मृतांची नावे जाहीर केलेली नाहीत, परंतु रंधवा यांचे मित्र, पत्रकार आणि चित्रपट निर्माते होपवेल चिनोनो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) द्वारे शोकसंदेश देखील पोस्ट केला. या अपघातामुळे झिम्बाब्वेमधील उद्योगजगतावर, भारतीय समुदायावर शोककळा पसरली आहे. 

इतर महत्त्वाची बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget