India on Pakistan- China : चीन-पाकिस्तानचे संयुक्त वक्तव्य भारताने फेटाळले, दिले करारी उत्तर
India on Pakistan- China : चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) आणि काश्मीरबाबत चीन आणि पाकिस्तानने केलेले वक्तव्य भारताने फेटाळले आहे.

India on Pakistan -China : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बीजिंग दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि चीनने संयुक्तरित्या केले वक्तव्य भारताने फेटाळे आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) आणि काश्मीरबाबत चीन आणि पाकिस्तानने वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर भारताने आक्षेप घेतला आहे. पाकिस्तान आणि चीनने अशा कृत्यांपासून दूर राहावे आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या भागातील त्यांच्या कारवाया थांबवाव्यात, असे भारताने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, आणि कायम राहतील. आम्ही अपेक्षा करतो की, दोन्ही देश भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. सीपीईसीबाबत चीन-पाकिस्तानपासून आम्ही नेहमीच चिंता व्यक्त केली आहे. भारताचा भूभाग असलेल्या या भागावर पाकिस्तानने बेकायदेशीर ताबा घेतला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकतेच चीनच्या दौऱ्यावर गेले होते. दोन्ही देशांनी 6 फेब्रुवारी रोजी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की, “जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवरील ताज्या घडामोडींची पाकिस्ताच्या बाजूने चीनला माहिती दिली आहे. यावर चीनने म्हटले आहे की, काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील वाद असून तो योग्य आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवला पाहिजे. या प्रश्नावर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ नये यासाठी चीनने कोणत्याही एकतर्फी कारवाईला विरोध केला आहे.
चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे की, सीपीईसीच्या पूर्ण विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी पाकिस्तानसोबत एकत्र येण्यास तयार आहे.
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
