India Pak war : आता पाकिस्तानची खैर नाही! भारतीय सैन्याला स्वीडनकडून मिळालं संहारक शस्त्र, कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर शत्रूची दाणादाण उडवणार
India Pak war : भारतीय सैन्याला स्वीडननं कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर पुरवल्याने पाकिस्तानचं टेन्शन चांगलंच वाढणार आहे.

India Pak war : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror War) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील तणाव अधिक तीव्र झाला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भारताकडून सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक होण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तरीदेखील पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धाची भाषा करत आहे. आता पाकिस्तानचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याला स्वीडननं कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर पुरवलं आहे.
कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर शत्रूची दाणादाण उडवणार
भारतीय सैन्याला स्वीडनने एक महत्त्वाचा शस्त्र पुरवलं आहे. कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर भारताला देण्यात आलेले आहे. सर्जिकल स्ट्राइक हे कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचरने केली जातात, हे या शस्त्राचे वैशिष्ट्य आहे. स्वीडनच्या साब कंपनीने सर्जिकल स्ट्राइकसाठी भारताला हे शस्त्र पुरवले आहे. साब कंपनीच्या या शस्त्राचा वापर शत्रूचे बंकर आणि दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड नष्ट करण्यासाठी केला जाईल. कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर हे एक अँटी आर्मर शस्त्र आहे. कुठल्याही प्रकारच्या शस्त्राविरोधात हे अँटी आर्मर शस्त्र वापरले जाते. शत्रू कडून रणगाडे किंवा तोफा मैदानात उतरवल्या जातात, तेव्हा त्या उद्ध्वस्त करण्यासाठी प्रामुख्याने या शस्त्राचा वापर केला जातो. आता भारताकडे कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर हे शस्त्र आल्याने लष्कराची ताकद वाढली आहे. तर या शस्त्रामुळे पाकिस्तानची चिंता वाढणार आहे.
26 राफेल विमानांचा खरेदी करार
तसेच, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल नौदल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतील बैठकीत या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्याचे समजते. या करारामुळे भारतीय नौदलाची सामरिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नव्या करारामुळे भारताकडे असलेल्या राफेल लढाऊ विमानांची एकूण संख्या आता 62 वर पोहोचणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























