एक्स्प्लोर

जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहावा

2017 साली भारत हा सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

न्यूयॉर्क : जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये नागरिकांच्या खासगी संपत्तीचा समावेश असून सरकारी संपत्ती वगळण्यात आली आहे. 64 हजार 584 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेला अमेरिका हा सर्वात धनाढ्य देश आहे. या यादीत चीन दुसऱ्या तर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली या देशांनाही मागे टाकलं आहे. 2017 साली भारत हा सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 2007 साली भारताची संपत्ती 3,165 अब्ज डॉलर होती. एका दशकात ती 160 टक्क्यांनी वाढून 8 हजार 230 अब्ज डॉलरवर गेली आहे. 2016 मध्ये भारताची संपत्ती 6 हजार 584 अब्ज डॉलर होती. म्हणजे वर्षभरात या संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळत आहे. भारतामध्ये एकूण 20 हजार 730 कोट्यधीश व्यक्ती आहेत. कोट्यधीशांचा विचार करता भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे. तर देशात 119 अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारताचा अमेरिका आणि चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.
क्रमांक देश संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये)
1 अमेरिका 64 हजार 584
2 चीन 24 हजार 803
3 जपान 19 हजार 522
4 ब्रिटन 9 हजार 919
5 जर्मनी 9 हजार 660
6 भारत 8 हजार 230
7 फ्रान्स 6 हजार 649
8 कॅनडा 6 हजार 393
9 ऑस्ट्रेलिया 6 हजार 142
10 इटली 4 हजार 276
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget