एक्स्प्लोर

कॅनडा -भारतातील संघर्ष शिगेला; अमेरिकेनं बाजू काढली, भारताला विशेष सवलत देणार नसल्याचा घेतला पवित्रा

India Canada Tension: अमेरिकेचे संरक्षण सल्लागार म्हणाले की, अमेरिका उच्च पातळीवर भारतीयांच्या संपर्कात आहे आणि सरकार या प्रकरणी भारताला कोणतीही 'विशेष सवलत' देत नाही.

India Canada Tension: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येचा आरोप कॅनडानं (Canada) भारतावर केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती. याबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेके सुलिव्हन यांनी म्हटलं आहे की, अमेरिका कॅनडाच्या आरोपांबाबत अत्यंत चिंतेत आहे, आमचं तपासाला पूर्णपणे समर्थन आहे आणि दोषींना न्याय मिळवून देण्याची इच्छा आहे. 

अमेरिका कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे जेक सुलिव्हन यांनी सांगितलं. निज्जर हत्येवरून अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले की, "अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद असल्याचं मी ठामपणे नाकारतो. आम्ही (कॅनडाच्या) आरोपांबद्दल खूप चिंतित आहोत, तपास पुढे जावा आणि गुन्हेगारांना जबाबदार धरलं जावं, अशी आमची इच्छा आहे. हा मुद्दा जाहीर झाल्यापासून अमेरिका तपास होण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत अमेरिका ठाम राहील."

भारताबाबत अमेरिकेचं म्हणणं काय?

जेके सुलिव्हन यांनी म्हटलं की, कॅनडामध्ये एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येबद्दल कॅनडाच्या दाव्यानंतर अमेरिकेचे काही अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि सरकार या प्रकरणी भारताला कोणतीही 'विशेष सवलत' देत नाही.

आरोपावर भारताची भूमिका?

भारतानं कॅनडाचे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतानं कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलं होतं. कॅनडा आपल्या देशात खलिस्तानींना आश्रय देत असल्याचा आरोप भारतानं केला आहे. तसेच, हा मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी कॅनडा भारतावर असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं भारतानं म्हटलं आहे. तसेच, इकडचं-तिकडचं न बोलता, निज्जरच्या हत्येबाबत जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत पुरावे द्या, असं थेट आव्हानंही भारताच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून अमेरिकेनं जी 20 परिषदेतच सांगितलेलं, पण... 

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची कॅनडात हत्या झाल्यानंतर कॅनडा सरकारकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले. या घटनेनंतर आता दोन्ही पक्षातील द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारताकडून कॅनडा व्हिसावरही बंदी घालण्यात आली आहे. कॅनडाने केलेल्या थेट आरोपानंतर भारतात संतापाची लाट उसळली असतानाच आता अमेरिकसह पाच देशांनी नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. फायन्साशिअल टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह इतर पाश्चिमात्य देशांनी निज्जरचा हत्येचा मुद्दा जी 20 परिषदेत उपस्थित केला होता, असेही या वृत्तात म्हटले आहे. यामुळे आता जी 20 आयोजन करताना भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना मोदी  सरकारकडून कानाडोळा करण्यात आला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Joe Biden : दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून अमेरिकसह 5 देशांनी जी 20 परिषदेत बोट दाखवूनही मोदी सरकारचा कानाडोळा? 

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Solar Storm Alert : सूर्यावरील प्रचंड स्फोटाचा आज पृथ्वीला तडाखा; भारतात 'ऑरोरा' दिसण्याची शक्यता, नासाकडून सर्तकतेच इशारा
सूर्यावरील प्रचंड स्फोटाचा आज पृथ्वीला तडाखा; भारतात 'ऑरोरा' दिसण्याची शक्यता, नासाकडून सर्तकतेच इशारा

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget