In Canada SUV into crowd : कॅनडात भरधाव कारने गर्दीला चिरडले, हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू, डझनभर जखमी; 'लापू-लापू' उत्सवादरम्यान भयावह घटना
In Canada SUV into crowd : एसयूव्ही कारने गर्दीला चिरडल्याने या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अद्याप उघड झालेला नाही.

In Canada SUV into crowd : कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये एसयूव्ही कारने गर्दीला चिरडल्याने या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अद्याप उघड झालेला नाही. कॅनडामधील व्हँकुव्हर पोलिसांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे आठ वाजता) फिलिपिनो समुदायाच्या 'लापू-लापू' या उत्सवादरम्यान घडली.
Additional footage from the scene of the incident at the Lapu Lapu Festival in Vancouver, Canada, in which an individual drove through a crowd of festivalgoers on a closed-off street, with reports right now suggesting 5-10 fatalities and well over a dozen injuries. The suspect is… pic.twitter.com/WNfYp9mXDh
— OSINTdefender (@sentdefender) April 27, 2025
शनिवारी रात्री ई-43व्या अव्हेन्यू आणि फ्रेझर येथे एका स्ट्रीट फेस्टिव्हलमध्ये कार गर्दी घुसवल्याने (in Vancouver Canada Multiple people dead) अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तो आशियाई वंशाचा असल्याचे सांगितले जाते.
कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, या घटनेनं मला खूप दुःख झाले आहे
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी म्हणाले की, या घटनेने त्यांना खूप दुःख झाले आहे. "मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या प्रियजनांना, फिलिपिनो-कॅनेडियन समुदायाला आणि व्हँकुव्हरच्या सर्व लोकांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो," असे त्यांनी X वर लिहिले. या दुःखात आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
Initial reports of several killed and over a dozen injured, after an SUV plowed into a closed-off street filled with people celebrating the Lapu Lapu Festival in Vancouver, Canada. pic.twitter.com/cLQQPfOMCq
— OSINTdefender (@sentdefender) April 27, 2025
"आजच्या लापू लापू दिनाच्या कार्यक्रमात घडलेल्या भयानक घटनेने मला धक्का बसला आहे आणि खूप दुःख झाले आहे," असे व्हँकुव्हरचे महापौर केन सिम म्हणाले. या अत्यंत कठीण काळात आमच्या संवेदना व्हँकुव्हरमधील सर्व प्रभावित लोकांसोबत आणि फिलिपिनो समुदायासोबत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या




















