स्वातंत्र दिनी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार!
इतिहासात पहिल्यांदाच न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर भारताच्या स्वातंत्रदिनी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. अमेरिकेतील एका ग्रुपने यासंदर्भात घोषणा केली आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका ग्रुपने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकावणार असल्याची घोषणा केली आहे. न्यूयॉर्क शहरातील या खास स्थानावर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार आहे. तीन राज्य न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट येथील फेडरेसन ऑफ इंडियन असोसिएशन (एफआयए) ने बोलताना सांगितले की, टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदात तिरंगा फडकवून 15 ऑगस्ट 2020 रोजी इतिहास रचण्यात येणार आहे. या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जायसवाल ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
टाइम्स स्क्वेअरवर भगवान राम आणि मंदिराचे फोटो
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये विशाल बिलबोर्डवर प्रभू राम आणि भव्य राम मंदिराचे थ्री डी फोटो प्रदर्शित करण्यात आले होते. विशाल नॅस्डेक स्क्रीन व्यतिरिक्त 17,000 चौरस फूट एलईडी स्क्रिनवर थ्रीडी फोटों प्रदर्शित केले गेले होते.
दरम्यान, टाइम्स स्क्वेअरवर लावण्यात आलेला बिलबोर्ड जगातील सर्वात मोठा आणि आकर्षक बिलबोर्ड पैकी एक आहे. तसेच पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
अमेरिकेत 52.50 लाख लोकांना संसर्ग
कोरोना महामारीचा सर्वाधिक कहर जगातील महसत्ता म्हणून ओळखल्या जामाऱ्या अमेरिकेत दिसून आला. येथे सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर सर्वाधिक मृत्यूंची नोंदही करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी ठेवणारी वेबसाइट वल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या मंगळवारी सकाळपर्यंत 52 लाख 50 हजार इतकी होती. तसेच आतापर्यंत 1 लाख 66 हजार 160 लोकांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 27 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जे एकूण संसर्गाच्या 50 टक्के आहे. 23 लाख 75 हजार अॅक्टिव्ह केस आहेत.