एक्स्प्लोर
Advertisement
यूकेमध्ये हिंदू आणि ज्यू महिलेचा आंतरधर्मीय समलैंगिक विवाह
हा विवाह संपूर्ण यूकेमधला पहिला interfaith म्हणजेच आंतरधर्मीय समलैंगिक विवाह ठरला आहे. कलावती मिस्त्री आणि मिरीयम जेफरसन या दोघींनी मोठ्या धाडसानं हा विवाहाचा निर्णय घेतला.
लंडन : एकीकडे भारतासह जगभरात अनेक ठिकाणी समलैंगिक संबंधांना आक्षेप घेतला जात असताना, या संकल्पनेला चालना देणारी घटना समोर आली आहे. फक्त समलैंगिक नाही तर वंशद्वेषालाही चपराक देणारं हे उदाहरण आहे. युनायटेड किंग्डममध्ये हिंदू आणि ज्यू महिलेने समलैंगिक विवाह केला आहे.
हा लग्नसोहळा पूर्णपणे भारतीय पद्धतीनुसार करण्यात आला. हा विवाह संपूर्ण यूकेमधला पहिला interfaith म्हणजेच आंतरधर्मीय समलैंगिक विवाह ठरला आहे. कलावती मिस्त्री आणि मिरीयम जेफरसन या दोघींनी मोठ्या धाडसानं हा विवाहाचा निर्णय घेतला.
वीस वर्षांपूर्वी कलावती अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिथेच कलावतीची भेट मिरीयमशी झाली. अखेर वयाच्या 48 व्या वर्षी दोघी हिंदू विवाह पद्धतीप्रमाणे लग्नबंधनात अडकल्या.
'हा प्रवास सोपा नव्हता. आपली संस्कृती आणि कुटुंबाशी झगडून हा निर्णय घेणं फार अवघड होतं. फार लहान वयातच मला समलैंगिक आकर्षण असल्याची जाणीव झाली होती. कुमारवयातच मी लेस्बियन असल्याचं स्वीकारलं. मात्र हे सगळं घरच्यांना समजावून सांगणं फार अवघड गेलं. कालांतराने त्यांनीही समजून घेऊन मला साथ दिली.' असं कलावतीनं सांगितलं.
समलैंगिक आकर्षण असणं हे समाजाच्या दृष्टीने गुन्ह्यासारखं आहे. अनेक जण कित्येक वर्ष हे गुपित दडवून ठेवतात. पण त्यांच्या अशा भावना नैसर्गिक असल्याचा विचार फार कमी वेळा केला जातो. जगभरात अशाप्रकारे समलैंगिक आकर्षण असणारे, मग ते कोणत्याही धर्म किंवा वंशाचे असोत, त्यांच्यात एक प्रेमळ नातं असतं, असं कलावंती म्हणते.
मिरीयमसुद्धा या विवाहामुळे खुष आहे. कलावतीला भारतीय पद्धतीनं विवाह करण्याची फार इच्छा होती. तिच्या
आनंदातच माझा आनंद आहे, असं मिरीयम म्हणाली. कलावतीच्या परिवारानंही हसतमुखानं या जोडप्याचं स्वागत केलं.
आपल्या भावनांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या समलैंगिक जोडप्यांसाठी कलावती आणि मिरीयमचा विवाह सोहळा मोठं उदाहरण ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement