इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
एरेम न्यूजच्या वृत्तानुसार, ईराणी सांसद मोहम्मद रजा मीर यांनी म्हटले की, राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि काही अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (President) यांना घेऊन जाणार्या हेलिकॉप्टरला रविवारी अपघात झाला होता. पूर्व अजरबैजानजवळ त्यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) क्रॅश झाले होते, त्यानंतर त्यांच्या बचाव व शोधमोहिमेसाठी पथक रवाना झाले आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या हेलिकॉप्टरचा शोध लागला नाही. ईराणी टेलिव्हीजनच्या वृत्तानुसार इराणच्या तरबेज शहराचे खासदार मोहम्मद रजा मीर ताज यांनी म्हटले की, अद्याप राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर आढळून आले नाही. अधिकारी व सैन्य दलाचे पथक घटनास्थळावर पोहोचण्यासाठी ड्रोनचा उपयोग करत आहेत.
एरेम न्यूजच्या वृत्तानुसार, ईराणी सांसद मोहम्मद रजा मीर यांनी म्हटले की, राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि काही अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. मात्र, दुर्घटना झाल्याची माहिती मिळाल्यापासून या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यात येत असून अद्यापही रईसी व हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच, राष्ट्रपतींच्या प्रकृतीसंदर्भातही अद्याप काहीही माहिती मिळाली नसून शोधमोहिम वेगाने सुरू आहे. रोव्होल्युशनरी गार्ड, सैन्य दल आणि रेड क्रिसेंट दुर्घटनास्थळावर पोहोण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप ठिकाणावर पोहोचण्यात यश आलं नाही.
अजरबैजान प्रदेशातील जंगलात घडली दुर्घटना
ईराणी खासदार यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर पूर्व अजरबैजान प्रदेशातील जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले आहे. जो जंगलप्रदेश तबरीजपासून 106 किमी दूर आहे. हेलिकॉप्टरमधील लोकांशीही अद्याप संपर्क होऊ शकला नाही.
खराब हवामानामुळे हार्ड लँडींग
इराणचे मंत्री अहमद वाहिदी यांनी याबाबत बोलताना म्हटले की, राष्ट्रपती इब्राहिम वाहिदी हेलिकॉप्टरमधून जात होते. मात्र, खराब हवमान आणि घनदाट धुक्यांमुळे राष्ट्रपतींच्या ताफ्यात ज्या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती होते, त्याच हेलिकॉप्टरचे हार्ड लँडींग करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, मदत व बचाव कार्यासाठी सैन्य दलाचे पथक व संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचत आहेत. मात्र, खराब हवामानामुळे त्यांनाही घटनास्थली पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, एपीच्या वृत्तानुसार, अमेरिका परराष्ट्र विभागही ईराणी हेलिकॉप्टर व राष्ट्रपतींच्या घटनेवर बारकाईने नजर ठेऊन असल्याचे म्हटले आहे.